Vishwajit Rane, Varsha Usgaokar  Dainik Gomantak
गोवा

Goa News: गोंय टीबी मुक्त करुया! उसगाव, शिरोडा ग्रामपंचायतींनी जिंकला लढा; आरोग्य मंत्र्यांकडून कौतुक

Vishwajit Rane: गोव्यात क्षयरोगाच्या रुग्णांना मोफत निदान चाचण्या, उपचार सेवा आणि पोषण सहाय्य पुरविले जाते. गोव्याला ‘क्षय’मुक्त करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी सांगितले.

गोमन्तक डिजिटल टीम

Tuberculosis Free Campaign Goa

पणजी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘टीबी मुक्त पंचायत’ उपक्रमांतर्गत, पंचायतींना सक्रिय उपाययोजना करण्यासाठी सक्षम करण्यात आलेले आहे. गोव्यात क्षयरोगाच्या रुग्णांना मोफत निदान चाचण्या, उपचार सेवा आणि पोषण सहाय्य पुरविले जाते. गोव्याला ‘क्षय’मुक्त करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी सांगितले.

दरम्यान, सोमवारी झालेल्या क्षयरोग मुक्त प्रचार मोहीम कार्यक्रमात उसगाव आणि शिरोडा दोन्ही ग्रामपंचायतींना ‘क्षय’मुक्त घोषित करण्यात आले. निक्षय पोषण योजनेंतर्गत थेट लाभ हस्तांतरणाचा असंख्य रुग्णांना लाभ झाला असून निक्षय मित्रांद्वारे पोषण किटचे वाटपही करण्यात आले आहे.

प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर तसेच विनोदी अभिनेते जॉन डिसिल्वा यांनी क्षयरोग जागृती मोहिमेच्‍या जाहिरातीत काम केले असून त्यांनी ‘क्षयरोगमुक्त गोवा’साठी पुढाकार घेतला आहे. क्षय मुक्त भारत कार्यक्रमात क्षयरोगाविषयी जागरूकता वाढविण्यासाठी व्हिडिओ आणि रील मेकिंग स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली.

त्यांनी प्रसारमाध्यमांच्या शक्तीचा वापर करून क्षयरोगाविरुद्धच्या लढ्यात गोव्याच्या सुरू असलेल्या प्रयत्नांना ठळकपणे दाखवले. त्यांच्या व्हिडिओंनी केवळ लवकर निदान आणि उपचारांच्या महत्त्वावर भर दिला नाही तर ‘टीबी मुक्त पंचायत’ उपक्रमांतर्गत सामूहिक प्रयत्नांचे प्रदर्शनही केले आहे.

विश्वजित राणे म्हणाले की, वर्षा उसगावकर आणि आमचे कौटुंबिक संबंध आहेत. त्यांचे वडील आणि माझे वडील माजी मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांच्या मंत्रिमंडळात एकत्र होते. त्यामुळे त्यांच्या वाढदिवसाला आम्ही एकत्र कुटुंब जात होतो. त्यांनी आज देशभरात नाव कमावले आहे. त्यामुळे त्यांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट लोकांना गंभीर वाटते आणि ते विचार करतात.

आपली मातृभाषा महत्वाची असते. आपण जर आपली मातृभाषा बोललो नाही तर आपला विषय कसा पोहोचणार? एक गोमंतकीय म्हणून मी आरोग्य खात्याचे अभिनंदन करते, कारण त्यांनी एक चांगले पाऊल उचलले आहे. ही जाहिरात जर घरोघरी पोहोचविली नाही तर ती झाली, असे आम्ही म्हणू शकत नाही.
वर्षा उसगावकर, अभिनेत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panaji: ‘बोर्डवॉक’ची पणजी महानगरपालिका दुरुस्ती करणार? 2 वर्षांपासून दुर्दशा; धोका असूनही नागरिकांचा वावर

Chandel Hasapur: सरपंचालाच मिळाली सरकारी नोकरी, पदासह दिला पंच सदस्यत्वाचा राजीनामा; चांदेल हसापूरमध्ये रंगणार रस्सीखेच

Goa ITI: ‘आयटीआय’ करणाऱ्यांसाठी खूशखबर! 2 वर्षांच्‍या कोर्सनंतर मिळणार दहावी, बारावी उत्तीर्ण प्रमाणपत्र; मुख्‍यमंत्र्यांची घोषणा

Vishwajit Rane: ..तर वेगळा 'गोवा' पाहायला मिळेल! आरोग्यमंत्री राणेंचे स्वच्छता अभियान; पणजी बसस्‍थानकावर केली साफसफाई

Goa Rain: सांगितला पाऊस, पडले 'कडकडीत' ऊन! ‘यलो अलर्ट’ घेतला मागे; 4 दिवस मध्यम पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT