Goa Health Minister Dainik Gomantak
गोवा

FDA Raid: आरोग्यमंत्र्यांनी केली धडक कारवाईची घोषणा; नियमांचे उल्लंघन करणाऱ्या फार्मसी आणि रेस्टॉरंट्सना बंद करण्याचा इशारा

Health Minister Vishwajeet Rane: राज्यातील लोकांच्या आरोग्याची हेळसांड करणाऱ्या रेस्टॉरंट आणि औषध दुकानांवर धडक कारवाई करणार

Akshata Chhatre

मडगाव: गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी शनिवारी (दि.१ मार्च) राज्यातील लोकांच्या आरोग्याची हेळसांड करणाऱ्या रेस्टॉरंट आणि औषध दुकानांवर धडक कारवाई करणार असल्याची घोषणा केलीये. मडगाव येथे पत्रकारांशी बोलताना राणे यांनी अन्न आणि औषध प्रशासनाच्या माध्यमातून राज्यात अन्न आणि औषधांची सुरक्षितता सुनिश्चित करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती दिली.

आरोग्यमंत्री राणे यांनी सांगितले की, FDA अधिकाऱ्यांनी कृत्रिमरित्या पिकवलेली फळे विकणाऱ्या आस्थापनांवर छापे टाकण्यास सुरुवात केली आहे आणि अन्न सुरक्षिततेवर लक्ष ठेवण्यासाठी यांचे काही नमुनेही तपासणीसाठी घेतले जात आहेत. "राज्यात विकले जाणारे अन्न सुरक्षित असावे यासाठी आम्ही कायम प्रयत्न करत राहू" असे राणे म्हणाले आणि व्यावसायिकांनी सुरक्षित अन्न तयार करत नियमांचे पालन करावे असे आवाहन त्यांनी केले आहे. याशिवाय, राणे यांनी राज्यातील रेस्टॉरंट्समध्ये ग्राहकांसाठी RO शुद्ध केलेले पाणी देण्यासह स्वच्छता नियमांचे पालन केले पाहिजे. अस्वच्छ परिस्थितीत चालणारे कोणतेही रेस्टॉरंट सहा महिन्यांसाठी तात्काळ बंद केले जाण्याचा इशाराही दिलाय.

औषध दुकानांवरही कारवाई

राज्यातील औषध दुकानांवरही कारवाई केली जाणार आहे. FDA अचानक छापे टाकून फार्मसी एक्सपायर झालेली औषधे विकत तर नाहीत याची खात्री करतील आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर गंभीर कारवाई केली जाईल.

ही कारवाई राज्य सरकारकडून केल्या जाणाऱ्या आरोग्याचे रक्षण करण्याच्या आणि व्यवसायांनी आवश्यक मानके पूर्ण करावीत यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा भाग आहेत असं आरोग्यमंत्री विश्वजीत राणे म्हणाले आहेत.

मी आणि मुख्यमंत्री एकाच पेजवर!

"मी आणि मुख्यमंत्री एकाच पेजवर आहोत. भारतीय जनता पार्टीतर्फे आम्हा दोघांकडून जनतेच्या हिताचे निर्णय घेतले जाणार आहेत. मला नर्सिंग कॉलेज हवे आहे आणि गोव्यासाठी अधिक जागा उपलब्ध झाल्या पाहिजेत. अंतिम निर्णय मी आणि मुख्यमंत्री सोबत घेऊ सर्व लोकांना विश्वासात घेऊन हिताचा निर्णय घेतला जाईल" अशी माहिती, आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT