Sattari Goa Dainik Gomantak
गोवा

Goa: झोपेत असताना घर कोसळले, सत्तरीतील निराधार महिलेला मंत्री राणे स्वखर्चाने बांधून देणार नवे घर

Goa News: आरोग्यमंत्री राणे यांनी या वृद्ध महिलेला नवीन घर बांधून देण्याचे आश्वासन दिले असून, हे घर ते स्वतःच्या खर्चाने उभारणार आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

गोमंतक ऑनलाईन टीम

वाळपई: मलपण-सत्तरी येथील पंढरी गावकर (६८) या निराधार महिलेचे राहते घर भर पावसात कोसळले असून घराच्या भिंतीला मोठे तडे गेल्यामुळे घर हळू हळू कोसळू लागले आहे. ही घटना शनिवारी (ता.१४) रात्री घडली.

पंढरी गावकर झोपल्या असताना जोरदार पावसाने घराचा काही भाग कोसळला. घराच्या भिंतींना तडे गेले असून घरात राहणे धोक्याचे आहे. सध्या त्या शेजारच्या घरात आश्रयाला असून महिन्याला मिळणाऱ्या २ हजार रुपयांवर गुजराण करत आहेत. त्या गरीब असून त्यांना कोणाचाच आधार नाही. त्या घरात एकट्याच राहायच्या.

Sattari Goa

दरम्यान, ही माहिती आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्यापर्यंत पोहोचताच त्यांनी तातडीने आपली टीम घटनास्थळी पाठवून परिस्थितीची माहिती घेतली. यानंतर आरोग्यमंत्री राणे यांनी या वृद्ध महिलेला नवीन घर बांधून देण्याचे आश्वासन दिले असून, हे घर ते स्वतःच्या खर्चाने उभारणार आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

Sattari Goa

सत्तरी हे माझे कुटुंब !

सत्तरी हे माझे कुटुंब आहे आणि इथल्या जनतेची जबाबदारी ही माझीच आहे. पंढरी गावकर यांचे मातीचे घर दुरुस्त होण्यासारखे नाही. त्यामुळे त्यांना मी स्वखर्चाने नवीन घर बांधून देणार आहे, असे आश्वासन आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT