खासदार प्रणिती शिंदेंचा सोलापूर - गोवा विमानसेवेला विरोध, म्हणाल्या, 'तस्करी वाढेल'; पालकमंत्री गोरेंनी लगावला खोचक टोला

Goa Solapur Flight: नुकतेच सुरु झालेल्या सोलापूर - गोवा विमानसेवेवरुन खासदार प्रणिती शिंदे आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शीतयुद्ध पेटले आहे.
MP Praniti Shinde Oppose Goa Solapur Flight
MP Praniti Shinde And MLA Jaykumar GoreDainik Gomantak
Published on
Updated on

सोलापूर: तब्बल 15 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सोलापूर शहरात विमानसेवा पुन्हा सुरू झाली. ०९ जून २०२५ पासून सोलापूर-गोवा विमानसेवेचा शुभारंभ झाला. नव्याने सुरु झालेल्या विमानसेवेमुळे व्यावसायिक आणि पर्यटकांनाही मोठा लाभ होणार आहे. पण, या विमानसेवेवरुन सोलापूरच्या काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यात कोल्डवॉर पेटले आहे. शिंदेंनी तस्करीचा मुद्दा उपस्थित करताच गोरेंनी त्यांना खोचक टोला लगावला.

"सोलापूरातून पुणे, मुंबई, बंगळुरु तसेच, हैदराबाद अशा ठिकाणी विमानसेवा सुरु करायला हवी. गोव्यासाठी विमानसेवा सुरु करुन तस्करीचे प्रमाण वाढेल," असा आरोप खासदार प्रणिती शिंदे यांनी केला.

याला प्रत्युत्तर देताना पालकमंत्री जयकुमार गोरेंनी शिंदेंना खोचक टोला लगावला. "अनेक दिवसांपासून सोलापूरात विमानसेवा सुरु होण्याची आम्ही वाट पाहत होतो. अखेर विमानाने उड्डाण केले आहे. पण, अनेकांना सोलापूर ते गोवा अशी विमानसेवा का सुरु केली असा प्रश्न पडलाय. यामुळे तस्करी वाढेल असं वाटतंय," असे जयकुमार गोरे म्हणाले.

MP Praniti Shinde Oppose Goa Solapur Flight
Goa Flight: गोव्यात घडली असती अहमदाबाद सारखी घटना; उड्डाण घेताच विमान आले खाली, 172 प्रवाशांनी जीव मुठीत घेऊन केला प्रवास Video

"गोव्यातून आजची पिढी बिघडून येईल, गोव्याला गेले के बिघडते हे कोणाला माहिती झाले. ते गोव्याला गेल्यावर बिघडून आले होते का?" असा टोला जयकुमार गोरेंनी प्रणिती शिंदे यांचे नाव न घेता लगावला.

"पहिल्यांदा देखील सोलापूरातून विमानसेवा सुरु होती. सोलापूर – मुंबई विमानसेवा सुरु होती. किंगफिशरचे विमान सोलापूरमध्ये येत होते. पण मोदी आल्यानंतर त्यांचा जन्म झालाय त्यांना जणू सोलापूरातून पहिल्यांदाच उड्डाण – टेकऑफ होतयं असं वाटतंय," असे प्रणिती शिंदे म्हणाल्या

MP Praniti Shinde Oppose Goa Solapur Flight
Kulagar Day Demand:हजारो वर्षे गोव्याचे सौंदर्य, पोषण कृषीउत्पादन पद्धतीने सांभाळले! नीज गोंयकारांनी पुढे यावे, ‘कुळागर दिन’ घोषित करावा

"व्यावसायिक, व्यापर याचा विकास व्हावा या दृष्टीकोणातून कोणत्याही शहरात विमानसेवा सुरु झाली पाहिजे. पण, गोव्यातून मुंबई किंवा इतर शहरात जाण्याची भाषा केली जातेय, काय सिद्ध करण्याचा प्रयत्न करताय," असे प्रणिती शिंदे म्हणाल्या.

दरम्यान, फ्लाय - ९१ या कंपनीने सोलापूर ते गोवा विमानसेवा ०९ जून पासून सुरु केली आहे. सोमवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार असे चार दिवस ही विमानसेवा सुरु असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com