Goa Crime: लग्न करण्यासाठी प्रेमी युगुल कर्नाटकातून गोव्यात आलं; वाद झाला अन् प्रियकराने प्रेयसीचा गळाच चिरला

Goa Murder Case: गोव्यात आल्यानंतर दोघांमध्ये कोणत्या तरी कारणावरुन वाद झाला यातच संजयने रोशिनीचा खून केला, अशी माहिती चौकशीतून समोर आली आहे.
Goa Murder Case
Goa Crime NewsDainik Gomantak
Published on
Updated on

धारबांदोडा: प्रतापनगर येथे झालेल्या तरुणीच्या खून प्रकरणी फोंडा पोलिसांनी बंगळुरु येथून एका संशयिताला अटक केली आहे. फोंडा पोलिसांनी तपास चक्रे गतीमान करत २४ तासांत संशयिताला अटक केली. तसेच, खून झालेल्या तरुणीची देखील ओळख पटली असून, चौकशीत अटक तरुणाने महत्वाची माहिती दिली आहे.

संजय केविन एम (२२, रा. उत्तर बंगळुरु, कर्नाटक) असे या खूनप्रकरणात अटक करण्यात आलेल्या संशयित तरुणाचे नाव आहे. तर, रोशिनी मोसेस एम. (२२, रा. उत्तर बंगळुरु, कर्नाटक) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. प्रतापनगर येथे घनदाट जंगलात रोशिनीची गळा चिरून हत्या करण्यात आली होती. मृत तरुणी अज्ञात असल्याने खूनाचा छडा लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले होते.

Goa Murder Case
खासदार प्रणिती शिंदेंचा सोलापूर - गोवा विमानसेवेला विरोध, म्हणाल्या, 'तस्करी वाढेल'; पालकमंत्री गोरेंनी लगावला खोचक टोला

दरम्यान, फोंडा पोलिसांनी तात्काळ कारवाई करत खून प्रकरणातील संशयित संजय केविनला बंगळुरु येथून अटक केली. पोलिसांच्या चौकशीत संजयने महत्वाची माहिती दिली आहे. संजय आणि रोशिनी यांचे एकमेकांवर प्रेम होते, दोघांना लग्न करायचे होते. लग्न करण्यासाठीच ते बंगळुरुतून गोव्यात आले होते.

गोव्यात आल्यानंतर दोघांमध्ये कोणत्या तरी कारणावरुन वाद झाला यातच संजयने रोशिनीचा खून केला, अशी माहिती चौकशीतून समोर आली आहे.

Goa Murder Case
Goa Flight: गोव्यात घडली असती अहमदाबाद सारखी घटना; उड्डाण घेताच विमान आले खाली, 172 प्रवाशांनी जीव मुठीत घेऊन केला प्रवास Video

या खून प्रकरणात आणखी सत्य समोर येण्याची शक्यता आहे. दोघे लग्न करण्यासाठी गोव्यात आले होते तर नेमके दोघांमध्ये काय बिनसले आणि प्रियकराने टोकाचे पाऊल उचलत प्रेयसीचा खून केला? याबाबत चौकशीतून माहिती समोर येण्याची शक्यता आहे. दरम्यान, पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Crime And Social Concerns
Goa Uncle Murder Case
Goa Government Cyber Security
 Goa Online Investment Fraud
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com