Bhironda Panchayat Dainik Gomantak
गोवा

Goa: पूरग्रस्तांना आरोग्यमंत्र्यांनी दिला आसरा

या संबंधी त्यांच्या पत्नी तथा सामाजिक कार्यकर्त्या दिव्या राणे (Divya Rane) यांच्यानी त्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांना घर बांधून देण्याचे आश्वासन दिले आहे.

दैनिक गोमन्तक

पिसुर्ले: गेल्या महिन्यातील 23 तारखेला म्हादई नदीला (Mhadai River) आलेल्या महापूरात भिरोंडा पंचायत क्षेत्रातील (Bhironda Panchayat) बऱ्याच नागरिकांची घरे जमीनदोस्त होतानाच या ठिकाणी दुर्गम अशा भागात राहणाऱ्या वांते बोनकवली वाडा येथे वास्तव्य करून राहणाऱ्या पांडू व उत्तम गावडे (Uttam Gavade) या दोन आदिवासी बांधवांचे घर कोसळून संपूर्ण संसार उद्धवस्त झाला होता, त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या या कुटुंबातील सदस्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला होता, याची दखल घेऊन वाळपई मतदार संघाचे आमदार तथा राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे (Health Minister Vishwajit Rane) यांनी सदर कुटुंबांना घर बांधून देण्याची ग्वाही दिली आहे, या संबंधी त्यांच्या पत्नी तथा सामाजिक कार्यकर्त्या दिव्या राणे यांच्यानी त्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांना घर बांधून देण्याचे आश्वासन दिले आहे.

सदर पुरामुळे या भागातील बऱ्याच नागरिकांची करोडा रूपयांची नुकसान झाले आहे, त्यात रोजंदारी वर काम करून पोट भरण्याऱ्याचा समावेश आहे, त्यामुळे त्यांच्या समोर हालाखीचे जीवन जगताना उद्ध्वस्त झालेला संसार कसा उभा करावा हा यक्षप्रश्न निर्माण झाला होता, त्यापैकी पांडू व उत्तम गावडे या आदिवासी कुटुंबांचा समावेश होता.

याची दखल घेऊन या कुटुंबाला मदत करून त्याचा उद्ध्वस्त झालेला संसार पुन्हा उभा करून देण्याची जबाबदारी राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी घेतली आहे, त्यानुसार त्यांच्या पत्नी दिव्या राणे यांनी स्थानिक पंच यांच्या सोबत गावडे कुटुंबांची भेट घेऊन त्यांना, काही प्रमाणात साधन सामुग्री दिली व येणाऱ्या काही दिवसात त्यांना पक्के घर बांधून देण्यात येईल असे आश्वासन दिले आहे. यावेळी त्यांच्या सोबत सामाजिक कार्यकर्ते विनोद शिंदे, पंच उदयसिंह राणे आदी उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa ZP Election: "आम्हाला एकही उमेदवार नको असेल तर?" बॅलेट पेपरवर 'नोटा'चा पर्याय नाही; सुर्ल साखळीतील मतदारांची नाराजी

Salt Production Goa: गोव्यात एकेकाळी 75 पेक्षा अधिक मिठागरे होती, 130 प्रकारची मिठे होती; गोमंतकीयांची खरी चव नष्ट होत चालली आहे

Goa Crime: 2024 साली संपला व्हिसा, तरी गोव्यात भाड्याच्या खोलीत मुक्काम; 2 परदेशी नागरिकांची न्यायालयीन कोठडीत रवानगी

Goa ZP Election 2025 Live Update:सकाळी 10 पर्यंत पाळीत सर्वाधिक, तर ताळगावमध्ये सर्वात कमी मतदान

Goa Crime: सोन्याचे दागिने हिसकावले, आरोपीला 3 महिन्यांची शिक्षा; चौकशी अधिकाऱ्यालाही काढले वॉरंट

SCROLL FOR NEXT