Vishwajit Rane  Dainik Gomantak
गोवा

Goa Health: कॅन्सर, दुर्धर आजारांवरील औषधं 50-60% स्वस्त होणार; आरोग्य खात्याचा सरकारकडे महत्त्वपूर्ण प्रस्ताव, आरोग्यमंत्र्यांनी दिली माहिती

आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी आज (२१ मार्च) पणजीत पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली.

Sameer Amunekar

पणजी: राज्यातील कर्करोग व इतर दुर्धर आजारांवरील औषधांचे दर मोठ्या प्रमाणावर कमी करण्याच्या दृष्टीने आरोग्य संचालनालयानं महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. ५० ते ६० टक्के स्वस्त दरात कर्करोग व इतर दुर्धर आजारांवरील औषधं उपलब्ध करण्यासाठीची प्रक्रिया सुरू केली असून, याबाबतचा प्रस्ताव सरकारकडे सादर करण्यात आला आहे. आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी आज (२१ मार्च) पणजीत पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली.

ते म्हणाले, "कॉन्फिडेंशिलिटी प्राइसिंग या उपक्रमाअंतर्गत कंपन्यांकडून स्वस्त दरात औषधे उपलब्ध केली जातील. आरोग्य खात्याला ही औषधं कमी किमतीत मिळाल्यास संबंधित रुग्णांनाही त्या दरानं उपलब्ध करून देता येणार आहे."

राज्य सरकार कर्करोग आणि अन्य दुर्धर आजारांवरील महागड्या औषधांचे दर कमी करण्यासाठी प्रयत्नशील आहे. याच पार्श्वभूमीवर, रुग्णांना ५० ते ६० टक्के स्वस्त दरात औषधे उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य संचालनालयाने सरकारनं प्रस्ताव सादर केला आहे. मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर हा उपक्रम प्रत्यक्षात आणला जाणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी दिली.

गोवा वैद्यकीय महाविद्यालयात (GMC) फुफ्फुसांच्या कर्करोगाच्या तपासणीसाठी विशेष सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. एक्स-रे काढण्यासाठी येणाऱ्या रुग्णांची फुफ्फुसांच्या कर्करोगाची तपासणी केली जाणार आहे, असं विश्वजीत राणे यांनी सांगितलं.

कर्करोगावरील औषधे अत्यंत महाग असल्यामुळं उपचाराचा खर्च मोठा येतो. अनेक रुग्णांना आर्थिक परिस्थितीमुळे उपचार घेणं कठीण जातं. मात्र, सरकारच्या उपक्रमामुळं ही औषधं स्वस्त दरात मिळाल्यास रुग्णांना उपचारासाठी मोठा दिलासा मिळणार आहे.

राज्यातील प्रगत सुविधांसह कॅन्सर हॉस्पिटलची उभारणी जोरात सुरू असून, २०२६ पर्यंत ते हॉस्पिटल कार्यान्वित होईल, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी दिली. इमारतीच्या पहिल्या मजल्याच्या स्लॅबचे काम पूर्ण झाले आहे, आणि उर्वरित काम जलदगतीने सुरू असल्याचं विश्वजीत राणेंनी सांगितलं.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

The Castle Auction: कोट्यवधींना होणार सूझांच्या 'द कॅसल' चित्राचा लिलाव, भारतातील या दुर्मिळ कलाकृतीची खासियत काय?

Horoscope: करिअर, प्रेमात मिळणार यश! 'या' मूलांकांच्या व्यक्तींना 'सप्टेंबर' ठरणार भाग्यशाली

Goa Rain: पावसाचे धूमशान! डिचोलीत रौद्रावतार, पोर्तुगीजकालीन पूल पाण्याखाली; पूरसदृश्य स्थिती

Ravichandran Ashwin: 'या' मोठ्या लीगमध्ये खेळण्यासाठी अश्विनने घेतली IPL रिटायरमेंट? धक्कादायक खुलासा; बनणार पहिला भारतीय खेळाडू

Goa Live Updates: 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण, अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंद

SCROLL FOR NEXT