संकल्प या उपक्रमा अंतर्गत कार्यक्रमात संबोधताना कौशल्य विकास व उद्योजकता खात्याचे संचालक दिपक देसाई  व इतर मान्यवर(Goa) Dainik Gomantak
गोवा

Goa: 'उडाण' कार्यक्रमात महिलांना उद्योजकता विकासावर मार्गदर्शन

महिलांना उद्योजकता विकासातील कौशल्य आत्मसात करणे, त्या संबंधी जागृती व उपजिविका या विषयी मार्गदर्शन

Dainik Gomantak

Goa: हल्लीच मडगावी (Margao) कौशल्य विकास व उद्योजकता खात्यातर्फे (Skill Development and Entrepreneurship Department) संकल्प (Sankalp) या उपक्रमा अंतर्गत एका दिवसाच्या कार्यक्रमाचे आयोजन करुन महिलांना उद्योजकता विकासावर मार्गदर्शन करण्यात आले. कौशल्य कसे आत्मसात करणे, त्या संबंधी माहिती जागृती व उपजिविका प्रोत्साहन या संबंधीची माहिती देण्यात आली. हा कार्यक्रम फोरम फॉर इनोवेशन रिसर्च एण्ड एण्टरप्रिनरशीप (Forum for Innovation Research and Entrepreneurship) यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला.

या प्रसंगी विजय मरिनच्या खरेदी व्यवस्थापिका व रोटरी क्लब वास्कोच्या अध्यक्षा कविता दियलानी  उदघाटन समारंभाला उपस्थित होत्या. जेनोरा इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेडचे सीईओ व जीसीसीआयच्या आयटी विभागाचे चेअरमन मिलिंद प्रभू, कौशल्य विकास व उद्योजकता खात्याचे संचालक दिपक देसाई हे मान्यवर उपस्थित होते.

एफआयआयआरई चे सीईओ व्ही. एम कांबळी यानी सर्वांचे स्वागत केले. सहाय्यक प्रशिक्षण संचालक राजेश लोलयेकर यानी सर्वांचे आभार व्यक्त केले.एफआयआयआरईचे विकास व्यवस्थापक तुषार सावंत व द स्किल कंपनीच्या सीईओ पुमन शिरसाट हे प्रमुख वक्ते म्हणुन उपस्थित होते.  संपुर्ण दिवसाच्या कार्यक्रमात उद्योजकांचा प्रवास, त्यांच्यासमोरील आव्हाने, व जे साध्य झाले त्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.श्वेता हरमलकर यानी संपुर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Beef Shortage: गोव्यातील गोमांस पुरवठा साखळीला ब्रेक, गोरक्षकांच्या कथित हल्ल्यांविरोधात महाराष्ट्र कर्नाटकात संप!

GST 2.0: जीएसटीच्या नव्या दरांची लवकरच घोषणा! सिगारेटवर द्यावा लागणार 40 टक्के कर; केंद्र सरकारचा नवा प्रस्ताव

Honour Killing: डॉक्टर बहिणीची लहान भावानेच केली गोळ्या झाडून हत्या; थरकाप उडवणाऱ्या घटनेबाबत धक्कादायक खुलासा

Krishna Janmashtami 2025 Wishes In Marathi: 'कृष्ण' जन्मला ग बाई... जन्माष्टमीनिमित्त मित्रपरिवाराला पाठवा 'या' गोड, नटखट शुभेच्छा

Krishna Janmashtami 2025: कृष्ण जन्माष्टमीचा शुभ योग; 'या' 3 राशींवर राहिल श्रीकृष्णाची कृपा, परदेश प्रवासाचीही सुवर्णसंधी

SCROLL FOR NEXT