GST collection comparison Goa Dainik Gomantak
गोवा

GST Rates: 'जीएसटी' दरकपात लागू करा, अन्‍यथा कारवाई करु! करखात्‍याचा इशारा; परिपत्रक जारी

Goa GST Rates: काहीच दिवसांपूर्वी झालेल्‍या जीएसटी परिषदेच्‍या बैठकीत नागरिकांना दैनंदिन जीवनात लागणाऱ्या अनेक वस्‍तूंवरील जीएसटी कमी करण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला होता.

Sameer Panditrao

पणजी: जीएसटी परिषदेच्‍या ५६व्‍या बैठकीत निश्‍चित झालेल्‍या दरांची सोमवारपासून (ता. २२) योग्‍य पद्धतीने अंमलबजावणी करावी. जे व्‍यापारी, दुकानदार या कमी झालेल्‍या नवीन दरांची अंमलबजावणी करणार नाहीत त्‍यांच्‍यावर कायदेशीर कारवाई करण्‍यात येईल, असे परिपत्रक राज्‍य कर खात्‍याने आज जारी केले.

काहीच दिवसांपूर्वी झालेल्‍या जीएसटी परिषदेच्‍या बैठकीत नागरिकांना दैनंदिन जीवनात लागणाऱ्या अनेक वस्‍तूंवरील जीएसटी कमी करण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला होता. त्‍या निर्णयाची अंमलबजावणी गोव्‍यासह देशभर आजपासून करण्‍यात आली. सुधारीत दरांचा लाभ ग्राहकांपर्यंत पोहोचावा यासाठी राज्‍य कर खात्‍याने गोव्यातील व्यापारी संघटनांसह विविध भागधारकांशी समन्वय साधला आहे.

जीएसटी दरातील कपात आणि बचतीचे फायदे ग्राहकांना मिळावेत, यासाठी आवश्‍‍यक ती पावले उचलण्याचे आवाहन खात्‍याने व्यापारी आणि उद्योजकांना केले आहे.

शिवाय संबंधित अधिकाऱ्यांना जीएसटी सुधारणा सुरळीतपणे राबविण्यासाठी करदात्यांना पूर्ण सहकार्य करण्याचे तसेच रिटेल दुकानांना भेट देऊन नवीन दरांनुसार ग्राहकांना जीएसटी बचत दिली जात आहे की नाही, याची खात्री करण्याचे निर्देश दिले आहेत. या नियमांचे जे पालन करणार नाहीत, त्‍यांच्‍यावर कायदेशीर कारवाई करण्‍यात येईल, असे राज्‍य कर आयुक्त एस. एस. गिल यांनी परिपत्रकात म्‍हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope 2026: शनिदेवांच्या लाडक्या राशीवर होणार धनाचा वर्षाव! शुक्राच्या साथीनं चमकणार नशीब; नोकरीत बढती अन् व्यापारात दुप्पट नफा

मानवजातीच्या विनाशाची नवी वेळ निश्चित! 100 कोटी वर्षांनंतर सजीव सृष्टीचा होणार 'द एंड'; नासाच्या सुपरकॉम्प्युटरचा थरारक अंदाज

एलपीजी सिलेंडर की पीएनजी? स्मार्ट किचनसाठी निवडा योग्य पर्याय; स्टोरेजच्या कटकटीपासून ते बुकिंगच्या वेटिंगपर्यंत सिलेंडरची 5 आव्हाने

Global Terrorist Amir Hamza Attack: लाहोरमध्ये रक्ताचा सडा! हाफिज सईदचा विश्वासू आमीर हमजावर खूनी हल्ला; अज्ञात हल्लेखोरांनी झाडल्या गोळ्या

Goa IPL Betting Racket Busted: 6 जणांना बेड्या, 50 एटीएम कार्ड अन् 10 लाखांचा मुद्देमाल जप्त; गोव्यात सट्टेबाजीचं रॅकेट उद्ध्वस्त; सांगोल्ड्यात मध्यरात्री पोलिसांचा छापा

SCROLL FOR NEXT