Goa Green Cess Case Dainik Gomantak
गोवा

Goa Green Cess Case: कंपन्यांवरच्या मेहरबानीमुळेच 2014 पासून सरकारने महसूल बुडवला- आलेमाव

युरी आलेमाव: वसुलीला न्यायालयाकडून स्थगिती नाही

गोमन्तक डिजिटल टीम

Yuri Alemao मी विधानसभेत उपस्थित केलेल्या प्रश्नांना दिलेल्या उत्तरांच्या आधारे गोव्यात कोळशाची हाताळणी आणि वाहतूक करणाऱ्या कंपन्यांकडून सरकारने 2014 पासून गोवा ग्रामीण सुधारणा आणि कल्याण उपकर कायदा 2000 खाली महसूल गोळा केलेला नाही हे उघड झाले आहे, असा दावा विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केला.

गोवा विधानसभेच्या गेल्या अधिवेशनात मी हा मुद्दा उपस्थित केला होता.

उच्च न्यायालयात काही कंपन्यांकडून महसूल प्राप्तीविरोधात आवाहन देण्यात आल्याने हा महसूल गोळा करण्यात सरकारला अपयश आल्याची सारवासारव वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी करण्याचा प्रयत्न केला.

मात्र मला उत्तरासोबत दिलेल्या कागदपत्रांवरून महसूल वसुलीला न्यायालयाकडून स्थगिती नसल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे, असे युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.

माझ्या विधानसभेतील प्रश्नाला दिलेल्या उत्तरासोबत सरकारला आलेल्या न्यायालयाच्या नोटिशीच्या प्रती आणि सरकारने दाखल केलेली प्रतिज्ञापत्रे इत्यादींशी संबंधित काही कागदपत्रे दिली आहेत.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे मला परिशिष्ट ‘ड’ अंतर्गत दिलेल्या रिट याचिकेच्या प्रतीवर याचिका क्रमांक दिलेलाच नाही. 29 पैकी फक्त 5 कंपन्यांनी सरकारच्या सेस वसुलीवर न्यायालयात याचिका दाखल केलेली असताना भाजप सरकारने इतर कंपन्यांकडून महसूल गोळा केला नाही. यावरून सरकार फक्त मोठ्या कंपन्यांवर मेहरबानी करीत असल्याचे दिसून येते, असे युरी आलेमाव म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT