Goa Gram Sabha Dainik Gomantak
गोवा

Gram Sabha: बेकायदेशीर बांधकाम, कचरा, पार्किंग अशा विविध मुद्यांनी ग्रामसभा तापल्या! सविस्तर वाचा

अवेडे कोठंबी ग्रामसभेत विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली.

Kavya Powar

Goa Gram Sabha

आज झालेल्या ग्रामसभांमध्ये विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली.

अवेडे कोठंबी ग्रामसभा

अवेडे कोठंबी ग्रामसभेत विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली. Adinco Industries च्या डिस्टिलरी कारखान्यासाठी सध्या गावातील खाजगी जागेत खोदकाम सुरू आहे. कारखान्याच्या वीजवाहिनीसाठी केलेल्या खोदकामाला नागरिकांनी ग्रामसभेत विरोध दर्शवला.

ग्रामपंचायतीची परवानगी न घेता हे काम सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. यावेळी अशा कोणत्याही खोदकामासाठी आपण परवानगी देणार नसल्याचे आश्वासन सरपंचांनी दिले.

तसेच कचरा समस्येवरही आज चर्चा झाली. योग्य सोयी सुविधा उपलब्ध करून कचरा कर गोळा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दुसरीकडे, काही दिवसांपूर्वी सौर उर्जेवर चालणारे दिवे चोरीला गेल्याची घटना समोर आली होती. तपासाअंती यामध्ये काही अल्पवयीन मुलांचा सहभाग असल्याचे उघडकीस आले. हा मुद्दा ग्रामसभेत उपस्थित झाल्यानंतर, सदर मुलांच्या पालकांशी आधी चर्चा करून मग त्या मुलांवर कारवाई करण्यात यावी, असे मत व्यक्त करण्यात आले.

चिखलीमधील घरांचे होणार पुनर्मूल्यांकन!

चिखली ग्रामसभेने घरांच्या पुनर्मूल्यांकनावर भर दिला आहे. घराच्या पुनर्मूल्यांकनामुळे पंचायतीचा महसूल सुमारे 7 पट वाढेल, अशी माहिती सरपंच कमलाप्रसाद यादव यांनी दिली.

'नो पार्किंग'मध्ये वाहने लावणाऱ्यांवर होणार कारवाई!

मुख्य रस्त्यावर तसेच किनारी भागातल्या नो पार्किंगमध्ये गाड्या पार्क करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे मोरजी ग्रामसभेचे संकेत. रस्त्याशेजारी लावलेले हॉटेल्सचे बोर्ड काढण्यासाठी पंधरा दिवसांची दिली मुदत. जिल्हा पंचायत निधीतून होणाऱ्या विकास कामांवरही झाली चर्चा.

नव्या महामार्ग आराखड्यासाठी भोमा पंचायतीचा ठराव!

भोमा आडकोण ग्रामसभेत गावातून जाणाऱ्या महामार्गाचा प्रस्थावित आराखडा रद्द करुन नव्याने करण्याबाबत ठराव संमत. यासाठी राज्य सरकार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरींशी करणार पत्रव्यवहार. ग्रामसभेत पंचायत क्षेत्रातील कुंडई औद्योगीक वसाहतीतील प्रदूषणाचाही मुद्दा ग्रामस्थांकडून उपस्थित.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

Calangute Illegal CRZ Construction: कळंगुटमधील अनधिकृत बांधकामांची 'घटका' जवळ! 'एनजीटी'कडून 'जीसीझेडएमए'चा पाडकाम आदेश कायम

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! वार्षिक वेतनवाढ 3 टक्क्यावरून 5 टक्के होणार? पगारात नेमकी किती वाढ होईल? जाणून घ्या

Goa Illegal liquor Seizure: कोंड्याच्या पोत्यांचा आडोसा अन् दारूची तस्करी! पेरणे अबकारी अधिकाऱ्यांच्या दक्षतेमुळे 3 लाख 78 हजारांचा माल जप्त

SCROLL FOR NEXT