Goa Biodigesters Dainik Gomantak
गोवा

Goa Biodigesters: दिवसाला 500 किलो कचऱ्याची विल्हेवाट लावणारे बायोडायजेस्टर बसवणार सरकार

Goa Bio-Digesters::नगरपालिका, ग्रामपंचायतींना राज्य सरकार करणार मदत

Akshay Nirmale

Goa Bio-Digesters: बायोडिग्रेडेबल कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी नगरपालिका आणि ग्रामपंचायतींना बायोडायजेस्टर्सची स्थापना करण्यास मदत करण्याचा निर्णय गोवा वेस्ट मॅनेजमेंट कॉर्पोरेशन (GWMC) ने घेतला आहे. यातील काही यंत्रे ही दिवसाला 500 किलोपर्यंत कचऱ्याची विल्हेवाट लावू शकतात.

GWMC ने उत्पादक, अधिकृत डीलर्स, एजन्सी आणि फर्म यांना विविध क्षमतेच्या बायोडायजेस्टरचा पुरवठा करण्यासाठी तसेच ते स्थापित करण्यासाठी आणि देखरेखीसाठी अर्ज करण्यासाठी आमंत्रित केले आहे.

यात प्रतीदिन 25 किलो, प्रतिदिन 75 किलो, प्रतिदिन 150 किलो, प्रतिदिन 300 किलो आणि प्रतिदिन 500 अशा विविध क्षमतांचे बायोडायजेस्टर्सची मागणी केली आहे. दरम्यान, हा करार तीन वर्षांसाठी असणार आहे.

GWMC चे व्यवस्थापकीय संचालक लेव्हिन्सन मार्टिन यांनी सांगितले की, "राज्य सरकार अशा कंपनीची निवड करेल जिथून नागरी संस्था आणि अगदी तुरुंगांनाही थेट मशीन खरेदी करता येईल.

सध्या राज्यात दररोज 766 टन घनकचरा तयार होतो. साळगाव आणि काकोडा येथे अनुक्रमे 250 टन प्रतिदिन आणि 100 टन प्रतिदिन क्षमतेचे घनकचरा प्रक्रिया प्रकल्प कार्यरत आहेत.

बायंगणी येथे घनकचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी तांत्रिक छाननीनंतर तीन निविदाकारांची निवड केली आहे. येत्या मे महिन्यात तज्ज्ञ समितीसमोर सादरीकरण आणि मूल्यमापनानंतर यशस्वी बोलीदारांना प्रस्तावासाठी विनंती (RFP) केली जाईल. आरएफपी या महिन्यात फ्लोट केले जातील.

अधिकाऱ्याने सांगितले की, IVL स्वीडिश रिसर्च इन्स्टिट्यूटने वेर्णा येथे वेस्ट-टू-एनर्जी प्लांट उभारण्यासाठी पूर्व व्यवहार्यता अभ्यास करून अहवाल सादर केला.

वेर्णा येथे 500 कोटी रुपये खर्चून कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारला जाईल आणि दररोज 250 टन कचऱ्यावर प्रक्रिया करून 16 मेगावॅट वीज आणि 38 मेगावॅट MW उष्णता निर्माण होईल.

हा गोव्यातील अशा प्रकारचा पहिला प्रकल्प आहे आणि जैवविघटन न करता येणारा कचरा सतत निर्माण होत असल्याने हा प्रकल्प टिकून राहील, असे एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने सांगितले.

वीज विभाग प्लांटमध्ये निर्माण होणारी वीज आणि वाफेची खरेदी करेल आणि उद्योगांना पुरवेल.

GWMC ने वेर्णा येथे एकात्मिक घनकचरा व्यवस्थापन आणि कचरा-ते-ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी पर्यावरण मंजुरी (EC) मिळविण्यासाठी राज्य पर्यावरण प्रभाव मूल्यांकन प्राधिकरणाकडे संपर्क साधला आहे. हा प्रकल्प राज्यातील चौथा असेल.

पर्यावरणीय मंजुरीनंतर प्लांट उभारण्यासाठी बोलीदाराची निवड करण्यासाठी निविदा काढली जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

Goa News Live: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

SCROLL FOR NEXT