Parking Issue Dainik Gomantak
गोवा

Parking Issue: पार्किंग शुल्कावरून दाम्पत्यास म्हापशात मारहाण; एकास अटक

Parking Issue: म्हापसा येथील नवीन केटीसी बस स्थानकावर पार्किंग शुल्काच्या वादातून सध्या मुबंईस्थित व मूळच्या कांदोळी येथील दाम्पत्यास मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी एकाला अटक केली.

दैनिक गोमन्तक

Parking Issue: म्हापसा येथील नवीन केटीसी बस स्थानकावर पार्किंग शुल्काच्या वादातून सध्या मुबंईस्थित व मूळच्या कांदोळी येथील दाम्पत्यास मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी एकाला अटक केली. तर, दुसरा संशयित फरार आहे.

प्राप्त माहितीनुसार, याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी संशयित रवी तलवार (23 , चंदनवाडी, बस्तोडा) याला अटक केली. डोमनिक लाएटो हे फिर्यादी आहेत. सदर घटना आज (ता.10) दुपारी घडली.

फिर्यादी हे आपल्या पत्नीसह येथील बस स्थानकाच्या पार्किंग तळावर आले होते. आपली चारचाकी पार्क करण्यासाठी त्यांनी पार्किंग अटेंडंटला सांगितले. त्याने थेट 50 रुपये सांगितले. मात्र, दर फलकावर 25 रुपये शुल्क असल्याचे फिर्यादींनी पार्किंग अटेंडंटला म्हटले. मात्र, पार्किंग अटेंडंटने त्यांचे ऐकले नाही व 50 रुपयेच द्यावे लागतील, असे सांगितले.

तसेच पार्किंग अटेंडंटने फिर्यादीस शिवीगाळ तसेच त्यांच्या चेहऱ्यावर मुठी मारल्या. यात ते जखमी झाले. तर संशयितांनी फिर्यादीच्या पत्नीसही शिवीगाळ केली.

याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी संशयित रवी तलवार याला अटक केली. तर, त्याचा दुसरा साथीदार अविनाश हा सध्या फरार आहे. पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ५०४, ३५४(अ), ५०९, ३२४, ४२७, ५०६(२) व ३४ अंतर्गत गुन्हा नोंदवून संशयितास अटक केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Christmas 2025: रंगीबेरंगी दिवे, मोठे ख्रिसमस ट्री! राज्यात नाताळ सणाची तयारी जोरात; रस्ते, बाजारपेठा सजावटीने उजळल्या

अग्रलेख: पक्ष-अपक्ष जिंकतील, लोक हरतील!

Manohar Parrikar: 'मनोहर पर्रीकर हे निर्भीड, धुरंधर, द्रष्टे राजकीय नेते'! बायणा रवींद्र भवनमध्ये जयंती साजरी; भाईंच्या आठवणींना उजाळा

मोठी बातमी! गोव्यातील राष्‍ट्रीय महामार्गांसंदर्भातील 151 कोटींचे 5 प्रकल्‍प प्रलंबित; लोकसभेत गडकरींनी केला खुलासा

Mungul Crime: मुंगूल गँगवॉरप्रकरणी नवी अपडेट! अन्य 11 संशयितांचा जामिनासाठी अर्ज; नायायालयात होणार सुनावणी

SCROLL FOR NEXT