Goa Department of Information and Publicity Photo Contest 2024 
गोवा

Goa Contest: तू खींच मेरी फोटो! गोवा सरकारने जाहीर केली स्पर्धा; विजेत्याला तब्बल 20 हजारांचे बक्षीस; असे व्हा सहभागी

Goa Government Photo Contest: प्रत्येक विभागात प्रत्येकी पाच उत्तेजनार्थ बक्षिसे दिली जाणार आहेत.

Pramod Yadav

Goa Photo Contest Department of Information and Publicity

पणजी: गोवा सरकारच्या माहिती आणि प्रसिद्धी विभागाच्या वतीने राज्य स्तरीय फोटो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दोन विभागात होणाऱ्या या स्पर्धेसाठी हाजारो रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत. स्पर्धेसाठी कोणत्याही प्रकारची फी आकरणी केली जाणार नाही तसेच, स्पर्धेसाठी वयाची देखील अट नाही.

स्पर्धेतील विजेत्यांना काय मिळणार? Goa State Level Photo Contest Prize

विभाग एक - अनएक्सप्लोर्ड टुरिस्ट स्पॉट इन गोवा

दुसरा विभाग - प्रमोटींग सेल्फ एम्पलॉयमेंट टु सस्टेन लाईव्हलीहूड

पहिले बक्षीस - वीस हजार रुपये

दुसरे बक्षीस - सोळा हजार रुपये आणि

तिसरे बक्षीस - बारा हजार रुपये

तसेच, प्रत्येक विभागात प्रत्येकी पाच उत्तेजनार्थ बक्षिसे दिली जाणार आहेत. सोबत दोन हजार रुपये रोख बक्षीस स्वरुपात दिले जातील शिवाय स्पर्धकांना सहभागाचे प्रमाणपत्र देखील दिले जाणार आहे.

नियम आणि अटी Goa State Level Photo Contest Terms And Condition

१) स्पर्धकांना १२*८ इंच आकारातील फोटो पाठवावा लागेल. एक उमेदवार जास्तीत जास्त चार फोटो एका किंवा दोन्ही विभागासाठी पाठवू शकतो.

२) स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी वयाची कोणतीही अट नाही तसेच प्रवेश शुल्क आकारले जाणार नाही.

३) स्पर्धकांना प्रवेशपत्रिकेसोबत रहिवासी दाखला जोडणे आवश्यक आहे.

४) मोबाईलद्वारे काढले जाणारे फोटो ग्राह्य धरले जाणार नाहीत.

५) चार ऑक्टोबर २०२४ सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्रवेशपत्रिका पाठवता येतील.

विजेत्यांना १६ नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय प्रेस दिनाच्या दिवशी बक्षीस वितरण केले जाणार आहे. अधिक माहितीसाठी सरकारच्या माहिती आणि प्रसिद्धी खात्याला संपर्क साधता येईल.

प्रवेशिका कुठे पाठवाव्यात? Department of Information and Publicity Goa Address

माहिती आणि प्रसिद्धी संचालक, तिसरा मजला, उद्योग भवन, पणजी, गोवा या पत्यावर सहभागी स्पर्धकांना प्रवेशपत्रिका पाठवायच्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Accident: छत्रीमुळे गेला जीव! स्कुटरवरून पडून महिलेचा दुर्दैवी अंत

Goa Crime: सुट्टी असतानाही गणवेशात घरातून निघाल्या; दोन शाळकरी मैत्रिणी बेपत्ता, कुंकळ्ळी पोलिसांकडून अपहरणाचा गुन्हा दाखल

Goa Opinion: आधी 'मौजमजा करण्यासाठी गोव्यात या' म्हणणारे, आता ‘गोवाच विकत घ्या’ म्हणताहेत..

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशी दिवशी 5 ग्रहांचा महायोग, 'या' राशींना मिळणार बंपर लाभ

Goa Live News Updates: गोवा डेअरीच्या दूध उत्पादकांना 12 कोटी 70 लाख रुपये मंजूर

SCROLL FOR NEXT