Transfer Of Agriculture Land Dainik Gomantak
गोवा

Transfer Of Agriculture Land: गोवा कृषी जमीन हस्तांतरण निर्बंध कायदा आजपासून लागू

राज्य महसूल खात्यातर्फे शेत जमीन विक्रीवर निर्बंध आणण्यासाठी विधानसभेत दुरुस्ती विधेयक मांडण्यात आले.

गोमन्तक डिजिटल टीम

Transfer Of Agriculture Land: गोव्यातील शेत जमिनीचे हस्तांतरण निर्बंध दुरुस्ती विधेयक काही सूचनानंतर आणि विरोधकांच्या गोंधळानंतर विधानसभा अधिवेशनात मंजूर करण्यात आला. दरम्यान, हा गोवा कृषी जमीन हस्तांतरण निर्बंध कायदा आजपासून (दि.18) लागू करण्यात आला आहे.

राज्य महसूल खात्यातर्फे शेत जमीन विक्रीवर निर्बंध आणण्यासाठी विधानसभेत दुरुस्ती विधेयक मांडण्यात आले. या विधेयकाला विरोधकांनी विरोध केला. परंतु तो सरकारने बहुमाताच्या जोरावर परतावून लावला.

महसूल मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी विधानसभेत विधेयक मांडले. त्यात जमीन खरेदी करणाऱ्यांना तीन वर्षे संबंधितास शेती करण्याची अट घालण्यात आली आहे. जर तीन वर्षे संबंधिताने शेती न केल्यास ती जमीन ताब्यात घेतली जाईल, अशी दुरुस्ती सूचविण्यात आली आहे. या विधेयकावर आमदार विजय सरदेसाई यांनी आक्षेप नोंदविला.

सर्व विरोधी आमदारांनी व्हेलमध्ये जात या विधेयकास विरोध केला होता. अखेर या गोंधळात हे विधेयक मंजूर करून घेण्यात आले. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT