GPSC DSP Advertisement 2023 Dainik Gomantak
गोवा

गोवेकर तरूणांना पोलिस अधिकारी होण्याची संधी, DSP पदांच्या थेट भरतीसाठी GPSC कडून जाहिरात प्रसिद्ध

सरकारी नोकरीच्या प्रतिक्षेत असलेल्या तरूणांना राज्यातील पोलिस खात्यात अधिकारी होण्याची संधी आहे.

Pramod Yadav

Govt Job In Goa GPSC DSP Advertisement 2023: गोव्यातील तरूणांसाठी आनंदाची बातमी आहे. सरकारी नोकरीच्या प्रतिक्षेत असलेल्या तरूणांना राज्यातील पोलिस खात्यात अधिकारी होण्याची संधी आहे. गोवा लोकसेवा आयोगाच्या वतीने पोलीस उप-अधीक्षकांची 28 पदे थेट भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केलीय.

यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले असून, 08 सप्टेंबर अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत आहे.

पोलीस उप-अधीक्षकांची 28 पदांपैकी 14 पदे अनारक्षित आहेत, 08 ओबीसी, 04 एसटी आणि ईडब्ल्यूएस साठी दोन पदे रिक्त आहेत.

उमेदवाराचे वय तीस वर्षांपेक्षा अधिक नसावे, तर कमीतकमी त्याचे वय 21 वर्ष असावे असे जाहिरातीत म्हटले आहे. उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापाठाची पदवी असणे अपेक्षित आहे.

सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी ईच्छुक उमेदवारांना GPSC च्या संकेतस्थळाला भेट देता येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT