Minister Subhash Phaldesai Dainik Gomantak
गोवा

अखेर IIT Goa साठी राज्य सरकारने जागा केली फिक्स; पणजीपासून 80 किलोमीटरवर उभारणार कॅम्पस

मंत्री सुभाष फळदेसाई यांची माहिती

Akshay Nirmale

Goa govt finalises land for IIT: गेल्या काही वर्षांपासून आयआयटी गोवा तात्पुरत्या कॅम्पसमध्ये कार्यरत आहे. तथापि, आता गोवा राज्य सरकारने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) गोव्याचा कायमस्वरूपी कॅम्पस उभारण्यासाठी जमिन निश्चित केली आहे.

राज्याचे समाजकल्याण मंत्री सुभाष फल देसाई यांनी आयआयटी गोवाच्या प्रकल्पस्थळाबाबत पीटीआयला माहिती दिली.

मंत्री फळदेसाई म्हणाले की, आयआयटी गोवा प्रकल्पासाठी राज्याची राजधानी पणजीपासून 80 किलोमीटर अंतरावर असलेल्या दक्षिण गोव्यातील रिवण गावात भूखंड निश्चित करण्यात आला आहे.

राज्य सरकारने गेल्या आठवड्यात जमिनीबाबत निर्णय घेतला. रिव्हण येथील ही जमीन 1 दशलक्ष चौरस मीटर इतकी आहे जी प्रकल्पासाठी योग्य आहे. त्यामुळे तिथे IIT कॅम्पससाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करणे योग्य ठरणार आहे.

ते म्हणाले, याआधीचे आयआयटी विरोधात झालेले आंदोलन पाहता सरकारने काही पावले आता उचलील आहेत. यावेळी आम्ही सर्व स्थानिकांना विश्वासात घेतले आहे. त्यांनी आम्हाला प्रकल्पासाठी मदत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

आयआयटी कॅम्पसच्या स्थापनेमुळे परिसराचा विकास होण्यास मदत होईल.

या प्रकल्पासाठी जागा शोधताना यापूर्वी राज्य सरकारला दोनवेळा लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. जानेवारी 2021 मध्ये, उत्तर गोव्याच्या सत्तरी तालुक्यातील शेल-मेळवली गावात झालेल्या निषेधानंतर, प्रस्तावित IIT गोवा कॅम्पस प्रकल्प दुसरीकडे हलविण्याचा निर्णय झाला.

त्यानंतर सरकारने कुठ्ठाळी येथे दुसरी जागा ठरवली होती. पण तिथेही स्थानिक लोकांचा विरोध झाला. त्यामुळे तिथे कॅम्पस उभारण्याचा विचार सोडून देण्यात आला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"तीन वर्षांत 9 विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या दडपणामुळे आयुष्य संपवलं, अभ्यासक्रमाचा फेरविचार करावा", आलेमाव यांची सरकारकडे मागणी

Sanju Samson: आशिया कप 2025 पूर्वी संजू सॅमसनची दमदार बॅटिंग, फक्त 'इतक्या' चेंडूत ठोकलं अर्धशतक

Online Betting Raid: गोवा पोलिसांचा डबल धमाका! ऑनलाइन सट्टेबाजी आणि दलालांवर एकाच वेळी कारवाईचा बडगा

Dewald Brevis: 22 वर्षीय बेबी एबीचं वादळ, ऑस्ट्रेलियाला धुतलं, विराट कोहली- बाबर आझमचा विक्रम उद्ध्वस्त

Goa Tourism: 'अन्यथा पर्यटन सेवा बंद करू!' म्हादईवरील रिव्हर राफ्टींग निधीसाठी पंचायत आक्रमक

SCROLL FOR NEXT