Central Government's decision to auction mining leases Dainik Gomantak
गोवा

Mining Leases : अखेर ठरलं! गोवा सरकारने 4 खाणपट्ट्यांसाठी काढली निविदा

डिचोली, सांगेसह 4 खाण ब्लॉक्ससाठी काढली निविदा

दैनिक गोमन्तक

गोव्यात खाणकाम सुरु होण्यासाठी सरकार सकारत्मक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी बऱ्याचदा स्पष्ट केले आहे. खाणकाम सुरु झाल्याने अनेक समस्या सुटतील असे ही काही मंत्र्यांनी म्हटले होते. याचं समर्थन करताना गोव्यातील अनेक लोकांना रोजगाराचा मार्ग मिळू शकेल असा ही मतप्रवाह समोर आला आहे. या पार्श्वभूमीवर आज गोवा सरकारने 4 खाणपट्ट्यांच्या लिलावासाठी ई-लिलाव निविदा काढल्याची माहिती समोर आली आहे.

(Goa govt invites bids for 4 mining blocks in Bicholim Sanguem Mayem Kalay)

राज्य सरकारने ही निविदा काढताना लीजांचा ई-लिलाव करणार असल्याचे म्हटले आहे. यामध्ये उत्तर गोव्यातील सांगे, डिचोली, मये आणि दक्षिण गोव्यातील काले या ठिकाणाच्या निविदा काढल्या आहेत. गोवा सरकारने या निविदा काढताना स्थानिक माध्यमांमध्ये जाहिरात जारी केली असून यासाठी केंद्र सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम MSTC ई-कॉमर्स सेवेद्वारे लिलाव केला जाणार असल्याची माहिती ही दिली आहे. त्यामूळे खुप दिवस खाणी सुरु होणार या चर्चेला आता पुर्णविराम मिळणार आहे.

लिलाव होणार्‍या ब्लॉक्सचा तपशील खालीलप्रमाणे

ब्लॉक I - डिचोली मिनरल ब्लॉक - 478.5206 हे.

खनिज क्षेत्र - 347.5609 हे., गैर-खनिजीकृत क्षेत्र - 130.9597 हे.

ब्लॉक-II - मये मिनरल ब्लॉक - 171.2472 हे.

खनिज क्षेत्र - 55.456 हेक्टर, गैर-खनिजीकृत क्षेत्र - 50.7939 हेक्टर, न शोधलेले क्षेत्र - 64.9973 हे.

ब्लॉक III - मये, शिरगाव मिनरल ब्लॉक - 95.6712 हे.

खनिज क्षेत्र - 29.80 हे., खनिज नसलेले क्षेत्र - 65.8712 हे.

ब्लॉक IV - काले खनिज ब्लॉक - 179.1826 हे.

खनिज क्षेत्र - 82.5250 हेक्टर, गैर-खनिजीकृत क्षेत्र - 21.1800 हेक्टर, अनपेक्षित लीज क्षेत्र - 75.4776 हे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"गोव्यात हे चाललंय काय?", 450 रुपयांच्या टॅक्सी स्कॅममधून सुटलो, पोलिसांनी 500 रुपये घेतले; जर्मन इन्फ्लुएंसरचा Video Viral

7th Pay Commission Goa: सातवा वेतन आयोग लागू करा! गोव्यातील पंचायत कर्मचाऱ्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

Ratnagiri: 'समुद्रस्नान' जीवावर बेतलं!गणपतीपुळे समुद्रात तीन पर्यटक बुडाले; एकाचा मृत्यू, दोघांना वाचवण्यात यश

Anaya Bangar Viral Video: ट्रान्सजेंडर क्रिकेटर अनाया बांगरचं दमदार कमबॅक, RCB ची किट बॅग घेऊन केली प्रॅक्टिस, WPL मध्ये खेळणार?

प्रभुदेसाईंच्या आंदोलनानंतर कृषी विभागाचे आश्वासन; भातकापणीसाठी देणार नवीन यंत्र

SCROLL FOR NEXT