Goa News: गेल्या दोन वर्षांत दक्षता खात्याकडे 695 तक्रारी दाखल झाल्या आहेत. या तक्रारींची प्राथमिक चौकशी करून 353 निकालात काढण्यात आल्या तर 342 तक्रारींची चौकशी करण्यात येत आहे. यामध्ये विविध खात्यांतील अधिकाऱ्यांविरुद्धच्या तक्रारींचा समावेश आहे.
गेल्या दोन वर्षांत सरासरी साडेतीनशे तक्रारी खात्याकडे दाखल होत आहेत, अशी माहिती विधानसभेत विचारलेल्या प्रश्नावर देण्यात आली.
दक्षता खात्याकडे सध्या 39 कर्मचारी काम करत आहेत. तक्रारीमधील तांत्रिक बाजू दक्षता अधिकाऱ्यांकडून तपासली जात आहे.
तसेच भ्रष्टाचार व घोटाळ्याची बाजू पोलिसांकडून तपासली जात आहे. दक्षता खात्याकडे तांत्रिक अधिकाऱ्यांची कमतरता असल्याने त्यांची नेमणूक करण्याची शिफारस वारंवार करण्यात आली,
मात्र विविध खात्यांतील या तांत्रिक अधिकाऱ्यांकडून कोणताच प्रतिसाद दिला जात नाही. विविध प्रकारच्या तक्रारी हाताळण्यासाठी वीज, जलस्रोत, पीडब्ल्यूडी या खात्यांतील तांत्रिक अधिकाऱ्यांची गरज असते.
मात्र त्यांची उणीव आहे. या अधिकाऱ्यांच्या जागा रिक्त आहेत. त्यामुळे तपासकामात उशीर होत आहे.
पोलिस अधीक्षकाची जागा रिक्त
सध्या दक्षता खात्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागामध्ये पोलिस अधीक्षकाची जागा रिक्त आहे. माजी अधीक्षक सेराफिन डायस हे निवृत्त होऊन तीन महिने उलटले तरी त्यांच्या जागी नवीन अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आलेली नाही. या पदाचा अतिरिक्त ताबा पोलिस मुख्यालयाचे अधीक्षक शेखर प्रभुदेसाई यांच्याकडे आहे.
त्यांच्याकडे असलेल्या कामाच्या ताणामुळे ते पूर्णवेळ या पदासाठी देऊ शकत नाहीत. या विभागात प्रकरणांचा तपास पोलिस निरीक्षकामार्फतच करणे आवश्यक असताना फक्त तीनच पोलिस निरीक्षक आहेत. त्यांच्या मदतीला दोन पोलिस उपनिरीक्षक आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.