Goa Government: रोजगार विनिमय केंद्रात 1.42 लाख उमेदवारांची नोंदणी

गेल्या चार वर्षांत राज्यातील रोजगार विनिमय केंद्रात 1 लाख 42 हजार 378 जणांनी नोंदणी केलेली आहे.
Employment |Goa Government
Employment |Goa GovernmentDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Government on Employment: गेल्या चार वर्षांत राज्यातील रोजगार विनिमय केंद्रात 1 लाख 42 हजार 378 जणांनी नोंदणी केलेली आहे.

त्यामध्ये 9 तृतीयपंथीयांचाही समावेश आहे. या चार वर्षांच्या काळात खासगी कंपन्यांमध्ये 24,255 रिक्त जागांची माहिती केंद्राला देण्यात आली आहे.

खासगी कंपन्या व सरकारी खात्यांमध्ये निमयित व कंत्राटी पद्धतीवर तसेच पूर्ण व अर्धवेळ मिळून 19,482 जणांना नोकऱ्या मिळाल्या आहेत, अशी माहिती विधानसभेतील एका प्रश्‍नावर कामगार व रोजगारमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी दिली.

Employment |Goa Government
Goa Government: नोकऱ्यांबाबत सरकारने फसविले; विरोधकांचा हल्लाबोल

केंद्राकडे नोंदणी झालेल्या उमेदवारांमध्ये मुलांची संख्या (75,684) मुलींपेक्षा (66,685) अधिक आहे. या केंद्राच्या मदतीने राज्य सरकारतर्फे तरुण व तरुणींसाठी मॉडेल करियर केंद्र सुरू करण्यात आले आहे.

या केंद्रामधून त्यांना प्रशिक्षण देऊन कार्यक्षमता वाढवण्याबरोबरच त्यांच्यामध्ये जागृती करण्यात येत आहे.

हे प्रशिक्षण घेतलेल्यांना सरकारी नोकरी मिळले याचे आश्‍वासन नसते तर प्रशिक्षणार्थी नोकरीव्यतिरिक्त आपला स्वतःचा व्यवसायही करू शकतो. ज्या खासगी कंपन्यांकडे २५ पेक्षा अधिक कामगार वर्ग आहे, त्यांना या रोजगार विनिमय केंद्राकडे रिक्त जागांची माहिती द्यावी लागते.

त्यानुसार 2018 मध्ये 5097, 2019 मध्ये 2633, 2020मध्ये 2882, 2021मध्ये 3422 तर 2022 मध्ये 13,318 रिक्त जागांची अधिसूचना काढण्यात आली होती.

2019 ते 2022 या चार वर्षाच्या काळात खासगी कंपन्यांमध्ये नियमित पद्धतीवर 7462 जागांवर तर पूर्णवेळ हंगामी पद्धतीवर 2845 उमेदवारांना घेण्यात आले आहे. सरकारने या काळात विविध खात्यांमध्ये 1482 जणांना नियमित सेवेचा रोजगार दिला आहे.

सरकारी खात्यांमध्ये 1743 जणांना कंत्राटी पद्धतीवर कामाला घेण्यात आले आहे. 1826 जणांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे तर 627 जणांना रोजंदारीवर घेण्यात आले आहे.

Employment |Goa Government
Pilerne Fire:…तर ‘बर्जर’ कंपनीचे स्‍थलांतर करणार

रोजगार मेळाव्‍याद्वारे ५७६ जणांनाच नोकऱ्या

गेल्यावर्षी नोव्हेंबर 2022 मध्ये गोव्यात महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. उमेदवारांकडून मिळालेल्‍या मोठ्या प्रतिसादामुळे एक दिवसाचा हा मेळावा दोन दिवसांचा करण्यात आला होता. या मेळाव्यासाठी 21 हजार 780 जणांनी ऑनलाईन नोंदणी केली होती, तर 170 कंपन्या सामील झाल्या होत्या.

या मेळाव्यात 576 जणांनाच नोकऱ्यांची ऑफर मिळाली. ज्यांना ही ऑफर मिळाली, त्यांच्यापैकी कितीजणांनी नोकऱ्या स्वीकारल्या ही माहिती सरकारकडे नाही. या इव्हेंटसाठी सरकारने केलेल्‍या खर्चाचा अजून हिशोब केलेला नाही.

मात्र डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियमचे एका दिवसाचे भाडे 6 लाख 28 हजार 232 रुपये आहे. आयोजन तसेच जाहिराती यावरील खर्चाचा हिशोब करायचा आहे अशी माहिती मंत्र्यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com