Govind Gaude Dainik Gomantak
गोवा

Govind Gaude: धमकी प्रकरण भोवणार? कला व संस्कृतीमंत्री गावडेंच्या विरोधात गुन्हा दाखल करा- कॉंग्रेसची मागणी

Govind Gaude: फोंडा येथील कार्यक्रमात न बोलावल्याने गावडे यांनी​ रेडकर यांना फोन करून हाच विषय ताणल्याचे या कथित ऑडिओतून दिसून आले.

Ganeshprasad Gogate

Govind Gaude: याआधी कला अकादमीप्रकरण नंतर तवडकर वाद आणि आता धमकी प्रकरण समोर आल्याने कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांच्या मागचे शुल्ककाष्ठ काही निघेना असं वाटू लागलं आहे.

प्रियोळ मतदारसंघात आयोजित एका कार्यक्रमावरून आदिवासी कल्याण खात्याचे संचालक दशरथ रेडकर यांना धमकी दिल्याचा त्यांचा कथित ऑडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मंत्री गावडें विरोधात गुन्हा दाखल करा अशी मागणी कॉंग्रेसने केली आहे.

एससी - एसटी आयोगाच्या आयुक्तांना फोनवर जीवे मारण्याबाबत भाष्य करणाऱ्या मंत्री गोविंद गावडेंवर तात्काळ एफआयआर नोंद करा अशी मागणी घेऊन कॉंग्रेसने पणजी पोलिस स्थानक गाठले आहे.

या संबंधी या आधी घडलेली माहिती अशी कि, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आयोगाने काही दिवसांपूर्वी फोंडा येथील सेवा या स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने प्रियोळ मतदारसंघातील म्हार्दोळमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

आदिवासी कल्याण खात्याच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. परंतु, या कार्यक्रमात स्थानिक सरपंच किंवा प्रियोळचे आमदार तथा मंत्री गोविंद गावडे यांना निमंत्रित करण्यात आले नव्हते.

हाच विषय मंत्री गावडे यांनी​ रेडकर यांना फोन करून ताणल्याचे या कथित ऑडिओतून दिसून आले आहे.

आपल्याला, स्थानिक लोकप्रतिनिधींना जाणीवपूर्वक डावलले जात असल्याचे आपल्या लक्षात आले आहे. ही बाब तुम्ही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि सभापती रमेश तवडकर यांना जाऊन सांगा.

तुम्ही करत असलेले कार्यक्रम मला कळले पाहिजेत, मला डावलून कार्यक्रम केल्यास जीवे मारीन अशी वाक्ये त्या ऑडिओतून सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: नात्यात पडणार नवा पेच? 'या' राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा, 'ही' एक गोष्ट टाळाच

Madhav Gadgil: झाडांनी दिली मानवंदना, माणसं मात्र जेमतेम! गाडगीळ यांचा अखेरचा प्रवास एकाकी : 'मनोरामा'च्या फोटो एडिटरची भावनिक पोस्ट

ISRO Research: सौर वादळांचा उपग्रहांवर परिणाम, 'आदित्य एल-1'च्या निरीक्षणांवर 'इस्रो'चे संशोधन

Premanand Maharaj Flat Fire: मथुरा येथील प्रेमानंद महाराजांच्या फ्लॅटला आग, सामान जळून खाक

Women's U-15 Cricket: गोव्याला 35 षटके फलंदाजीचे समाधान, जोया मीरचे अर्धशतक; पाचव्या पराभवासह मोहीम आटोपली

SCROLL FOR NEXT