Goa Governor |  Dainik Gomantak
गोवा

Goa Governor: इको-सेन्सेटिव्‍ह झोन प्रश्‍न सोडविण्‍यास प्रयत्‍नशील- राज्‍यपाल पिल्लई

Goa Governor: सांगे मतदारसंघातील काही भाग इको-सेन्सेटिव्‍ह झोन म्हणून जाहीर करण्यात येणार आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Governor: सांगे मतदारसंघातील काही भाग इको-सेन्सेटिव्‍ह झोन म्हणून जाहीर करण्यात येणार आहे. त्यास लोकांचा विरोध पाहता आपण ही समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी सांगितले. ‘संपूर्ण गोवा यात्रा’ या योजनेअंतर्गत काल १७ राजी संध्याकाळी रिवण येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

दरम्यान, यावेळी सांगेचे आमदार तथा समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई, जिल्हा पंचायत सदस्य सुरेश केपेकर, माजी आमदार वासुदेव गावकर, सरपंच वैशाली नाईक व इतर मान्यवर उपस्थित होते. राज्यपाल पिल्लई यांनी या भेटीत लाभार्थ्यांना आर्थिक मदत वितरीत केली. तसेच तेथील गुरुकुल आश्रमाला भेट देऊन तेथे शिकत असलेल्या विद्यार्थ्यांशी चर्चा केली.

भारताला 21व्‍या शतकात ‘विश्वगुरु’ बनविण्यासाठी अशा विद्यार्थ्यांचे मोठे योगदान लाभणार असल्याचे त्यांनी सांगितले.

विरोधासाठी विरोध नको- फळदेसाई

इको सेन्सेटिव्ह झोनचा प्रश्‍‍न सुटावा करण्यासाठी आपले प्राधान्य असेल. काही लोक फक्त विरोधासाठी विरोध करतात व याचा फटका चांगल्या प्रकल्पांना बसतो. सांगेत होऊ घातलेला आयआयटी प्रकल्‍प दुसऱ्या ठिकाणी गेल्यास यापुढे कोणतेही रोजगाराभिमुख उद्योग येथे येण्यास तयार होणार नाहीत, असे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी सांगितले. तसेच इको सेन्सेटिव्ह झोनप्रश्‍‍नी राज्यपालांनी लक्ष घालण्याचे आश्वासन दिल्‍याबद्दल त्‍यांनी समाधान व्‍यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT