Governor Pillai Dainik Gomantak
गोवा

Governor Pillai: पिल्लई यांना माजी राष्ट्रपती कोविंद यांच्या हस्ते डी लीट पदवी प्रदान

राज्यपाल पिल्लई: भुवनेश्वर येथे माजी राष्ट्रपतींच्या हस्ते डी लीट पदवी प्रदान

गोमन्तक डिजिटल टीम

Governor Pillai सार्वजनिक जीवनात वावरणारी व्यक्ती ही जनसेवक असते. सर्व कामांच्या मुळाशी जनकल्याण हे ध्येय असले पाहिजे. त्यामुळे अशा कामांची दखल घेत ‘डी लीट’सारखी पदवी मिळाली याचा निश्चितपणे आनंद आहे.

त्यातून आणखीन काम करण्यासाठी ऊर्जा मिळाली, अशी प्रतिक्रिया राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी भुवनेश्वर येथून ‘गोमन्तक’शी बोलताना दिली.

आज त्यांना माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते भुवनेश्वर येथील एएसबीएम विद्यापीठाची डी लीट ही पदवी दीक्षांत समारंभात प्रदान करण्यात आली.

राज्यपालांनी या प्रतिनिधीशी दूरध्वनीवर संवाद साधताना सांगितले, की साहित्याच्या क्षेत्रात मी गेली 60 वर्षे काम करत आहे. साहित्याचे सर्वप्रकार ज्यात कथा, कविता, वैचारिक लेखन यांचा समावेश आहे मी हाताळले आहेत.

या साऱ्याची दखल घेत भुवनेश्वरच्या विद्यापीठाने डी लीट पदवी देण्याचा प्रस्ताव दिला होता. सरकारचे हे विद्यापीठ असल्याने आणि माजी राष्ट्रपतींच्या हस्ते तो प्रदान करण्यात येणार असल्याने मी तो स्वीकारण्याचा निर्णय घेतला.

'तर देश जगाचे नेतृत्व करेल’

माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले, प्रत्येकाचे देश घडविण्यातील योगदान महत्त्वाचे असते. विद्यापीठांच्या आपल्या पातळीवर करत असलेल्या कामांचाही यात समावेश होतो. कोणतेही काम श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नसते. आपल्या जागी ते योग्यच असते. असे प्रत्येकाने देशाचा विचार करत काम केले तर देश जगाचे नेतृत्व करू शकेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ऑर्डर उशिरा का आणली?' म्हणत डिलिव्हरी बॉयला फ्लॅटमध्ये खेचून मारहाण, तीन मिनिटांचा CCTV व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! पगार किती वाढणार? फिटमेंट फॅक्टर किती असेल? 5 महत्त्वाचे अपडेट्स आले समोर

Rishabh Pant Record: गिलख्रिस्टचा वर्ल्ड रेकॉर्ड उद्ध्वस्त! ऋषभ पंत बनला 'सिक्सर किंग', परदेशात 'अशी' कामगिरी करणारा ठरला पहिलाच खेळाडू

Investment Fraud: भरघोस परताव्याचं स्वप्न दाखवलं अन् 85.5 लाखांवर डल्ला! शिवोलीतील महिलेची फसवणूक, मुंबईतील दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल

AUS vs BAN: क्रिकेटविश्वात मोठा उलटफेर! बांगलादेशनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 9 विकेट्सनं लोळवलं, 30 मिनिटांत कांगारूंचा खेळ खल्लास Watch Video

SCROLL FOR NEXT