Goa News|Environment Dainik Gomantak
गोवा

Goa News: राज्यपालांंनी केले हजार वर्षे जुन्या वटवृक्षाचे पूजन

31 वारसा वृक्षांच्या माहितीचे संकलन- राज्यपाल पी.एस. श्रीधरन पिल्लई यांचा उपक्रम

दैनिक गोमन्तक

Goa News: गोव्यातील वारसा वृक्ष संकलन पुस्तकासाठी राज्यपाल पी.एस. श्रीधरन पिल्लई यांनी पर्तगाळ येथील एक हजार वर्षांपूर्वीच्या वटवृक्षाचे गोकर्ण पर्तगाळी मठाचे श्रीमद्‌ विद्याधीश तीर्थ स्वामीजींच्या उपस्थितीत शास्त्रोक्त पूजन केले. यावेळी सभापती रमेश तवडकर, पैंगीण पंचायतीच्या सरपंच सविता तवडकर उपस्थित होत्या.

सदर पुस्तक इंग्रजी व हिंदी या दोन भाषांमध्ये प्रकाशित होणार आहे. पुरातन काळापासून मानव व निसर्ग यांचे नाते परस्परावलंबी आहे. पाश्‍चिमात्य संस्कृतीमुळे आज निसर्गाचा समतोल ढासळत आहे. भृगू ऋषींनी हवा,पाणी, आकाश, भूमी, अग्नी यांचा संगम वृक्षांमध्ये असल्याचे सांगितले आहे.

त्याचप्रमाणे दश पुत्राची बरोबरी एका वृक्षाबरोबर केली आहे, त्यामुळे जीवनात वृक्षाची महती कळून येते, असे राज्यपाल पिल्लई यांनी सांगितले. यावेळी श्रीमद् विद्याधीश तीर्थ स्वामीजींनी सांगितले, की वृक्षांना इजा पोहोचवल्याने त्याचा दोष माणसाला लागतो.

तो निवारण करण्यासाठी वास्तूचा गृहप्रवेश करण्यापूर्वी राक्षस होम सर्व नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर केल्यानंतर त्यांना संतुष्ट करण्यासाठी हा विधी करण्यात येतो.

वृक्षसंपदा, किनाऱ्यांविषयी माहितीपर पुस्तक!

राज्यातील 31 वारसा वृक्षांची माहिती संकलित करण्यात येणार आहे. त्या वृक्षांचे पौराणिक, ऐतिहासिक व पर्यावरणीय संदर्भाचा समावेश या पुस्तकात करण्यात येणार आहे. एका महिन्याच्या कालावधीत या सर्व वृक्षांना भेटी देण्यात येणार आहे त्याची सुरुवात पर्तगाळ येथील हजारो वर्षांपूर्वीच्या वट वृक्षाचे पूजन करून करण्यात आले.

त्या शिवाय लवकरच गोव्यातील बेटे, मंदिरे, चर्च व परिसरातील वृक्ष, निसर्ग याविषयी पुस्तके प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. ही सर्व पुस्तके सरकारी वाचनालये, सरकारी कार्यालये त्याचबरोबर देशांत व परदेशात विनामूल्य वितरित करण्यात येणार आहेत, असे राज्यपाल पी. श्रीधरन पिल्लई यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kirlpal: पाणीपुरवठा करणारी कुपनलिका बंद! संतप्त महिलांची कार्यालयावर धडक; तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा

LPG Gas Cylinder: सिलिंडरटंचाईचा मोठा फटका! कदंब स्थानकावरील कॅन्टीन बंद, वादावादीचे प्रकार वाढले; काही ठिकाणी चुलीला प्राधान्य

Valpoi: वाळपईत शिगमोत्सवात राडा! 2 ‘रोमटामेळ’ पथकांमध्ये मारामारी; समितीच्या प्रयत्नांमुळे शोभायात्रा शांततेत

Goa Politics: खरी कुजबुज; ...म्‍हणून भाजपकडून रितेशसह दळवींचे नाव

Ponda By Election: फोंडा पोटनिवडणुकीतही विरोधकांच्‍या एकीत बेकी! आप, आरजीपीही देणार उमेदवार; 'मगोप' समर्थकांचा भाटीकरांना पाठिंबा

SCROLL FOR NEXT