Manohar International Airport  Dainik Gomantak
गोवा

Manohar International Airport याच नावाचा वापर करा! 8 दिवसांत अंमलबजावणी न केल्यास...

Akshay Nirmale

Manohar International Airport: गोव्यातील मोपा येथील नवीन मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नावावरून अनेकदा गोंधळ केला जातो.

काही वेळा या विमानतळाचे नाव न्यू गोवा विमानतळ असे उच्चारले जाते. त्यावरून आता राज्य सरकारनेच विमानतळ कंपनीला याबाबत पत्र लिहिले आहे.

गोव्याच्या नागरी विमान उड्डाण खात्याने मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे व्यवस्थापन करणाऱ्या जीएमआर या विमानतळ कंपनीला पत्र लिहिले आहे.

या पत्रात म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या विमानतळाचे नाव मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ असे करण्यात आले आहे. त्यामुळे कंपनीने याच नावाचा उल्लेख नियमितपणे करावा. इतर कोणत्याही नावाने या विमानतळाला संबोधू नये.

मोपा येथील या ग्रीनफील्ड इंटरनॅशनल एअरपोर्टचे नामकरण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत 11 डिसेंबर 2022 रोजी मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ असे करण्यात आले. या नावाला केंद्रीय मंत्रीमंडळ, राज्य मंत्रीमंडळानेही मंजुरी दिली.

राज्याच्या विधानसभेतही त्याबाबत प्रस्ताव मंजूर झाला. त्यामुळे फ्लाईट्स, सोशल मीडिया अनाऊन्समेंट, ब्रँडिंगमध्ये याच नावाचा वापर व्हावा, नावाच्या पुढे मागे काहीही जोडू नये, असे निर्देश दिले गेले.

तथापि, या विमानतळाला जीएमआर गोवा इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (GGIAL) कंपनीतर्फे विमानतळाचा उल्लेख न्यू गोवा असा केला जात होता. त्यामुळे न्यू गोवा असा उल्लेख करणे तत्काळ थांबवावे.

मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ असाच उल्लेख सर्वत्र करण्यात यावा. 8 दिवसात याची अंमलबजावणी व्हावी, याबाबत काही तक्रार आढळून आल्यास त्याची गांभीर्याने दखल घेतली जाईल, असेही पत्रात म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबुज: रवींचे ‘एका दगडात दोन पक्षी’

Goa Crime: व्‍हिडिओ व्‍हायरल करण्‍याची धमकी देणाऱ्या तरुणास अटक; असाहाय्य माय-लेकींवर अत्‍याचार

St Estevam Accident: 'सांतइस्तेव प्रकरण' पोहोचणार मंत्रालयात? नातेवाईकांचे देवालाही साकडे

Bhutani Infra: ‘मेगा प्रोजेक्ट’ चे अधिकार आता मुख्यमंत्र्यांकडे; 'भूतानी’ला भाजप सरकारचीच परवानगी असा काँग्रेसचा दावा

बॉलीवूड, टॉलीवूडचा प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक जानी मास्टरला गोव्यात अटक, सहकारी महिलेचा 6 वर्षापासून लैंगिक छळ केल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT