internet Dainik Gomantak
गोवा

Goa Hotspot : गोवा होणार हायटेक; 10 हजार ठिकाणी लवकरच हॉटस्‍पॉट सेवा

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी घोषित केल्‍यानुसार राज्‍यात ‘हर घर फायबर’ योजना राबवली जाणार आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Hotspot : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी घोषित केल्‍यानुसार राज्‍यात ‘हर घर फायबर’ योजना राबवली जाणार आहे. गोवा स्‍टार्टअप आणि आयटी धोरणाअंतर्गत राज्‍यात 10 हजार ठिकाणी हॉटस्‍पॉट सेवा देण्यात येणार आहे, अशी माहिती माहिती आणि तंत्रज्ञानमंत्री रोहन खंवटे यांनी दिली. सरकारच्या या निर्णयामुळे गोव्याला हायटेक बनवण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

पर्यटन भवन-पाटो येथे आयोजित गोवा स्‍टार्टअप धोरण 2021 आणि गोवा आयटी धोरण 2018 तसेच राज्‍यातील स्‍टार्टअप-आयटी प्रचार विभागाची जबाबदारी या अंतर्गत आयोजित सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उपस्‍थित होते. हॉटस्‍पॉट सुरू करण्याविषयी काही आमदारांनी सरकारला विनंती केली आहे. ही सेवा सर्वच मतदारसंघांत देण्याविषयी निर्णय झाला असल्याचे ते म्हणाले.

गोव्यात अनेक ठिकाणी इंटरनेट सेवा अजूनही उपलब्ध नाही. त्यामुळे या योजनेच्या माध्यमातून गोव्यातील प्रत्येक गाव जगाच्या नकाशावर येणार आहे. याचा फायदा शाळकरी तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी, व्यावसायिक, बँका, विविध आस्थापनं यांच्यासह गुगल मॅपच्या साहाय्याने आपला मार्ग शोधणाऱ्या वाहनचालकांनाही होणार आहे. सरकारच्या या नव्या योजनेमुळे गोवा आणखी प्रगतीपथावर जाणार असून आमदारांनी केलेली मागणी सरकारने मान्य केल्यामुळे त्यांनीही यावर समाधान व्यक्त केलं आहे. ही सेवा सर्वच मतदारसंघांमध्ये दिली जाणार असल्यामुळे आगामी निवडणुकीसाठीही सरकारला याचा फायदाच होणार असल्याचं बोललं जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

Delhi Protest: आंदोलकांचा धूर अन् लोकशाहीचे अश्रू! 'क्रॉक्रोच जनता पार्टी'च्या आंदोलनाने फाडला व्यवस्थेचा बुरखा; जे. पी. नड्डांची मध्यस्थी ठरली उशिराची अक्कल?

History Of Hunger Strike in India: गांधीजींच्या सत्याग्रहापासून वांगचूक यांच्या उपोषणापर्यंत! भारतातील 'अहिंसक शस्त्रा'चा संघर्ष अन् सरकार समोरील मोठे आव्हान

SCROLL FOR NEXT