Mahadayi Water Dispute Dainik Gomantak
गोवा

Mahadayi Water Dispute : म्हादईप्रश्नी सुप्रीम कोर्टात अंतरिम अर्ज दाखल करणार; राज्याच्या महाधिवक्त्यांची माहिती

म्हादई नदीच्या पाणीप्रश्नावरुन सध्या गोवा आणि कर्नाटक राज्यांमधील वाद विकोपाला

गोमन्तक डिजिटल टीम

म्हादईप्रश्नी गोवा सरकार पुढील आठवड्यात सर्वाेच्च न्यायालयात अंतरिम अर्ज दाखल करणार आहे अशी माहिती अ‍ॅडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी दिली. केंद्र सरकारच काय कुणीही म्हादईचं पाणी पळवू शकत नाही. त्यामुळे केंद्राकडे डीपीआर कॉपी पुरवण्यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचं पांगम यांनी काही दिवसांपुर्वी स्पष्ट केलं होतं.

म्हादई नदीच्या पाणीप्रश्नावरुन सध्या गोवा आणि कर्नाटक राज्यांमधील वाद विकोपाला गेला आहे. म्हादईचं पाणी वळवून ते मलप्रभा नदीत वळवण्याच्या कर्नाटकच्या कृतीचा गोव्यात गेल्या आठवड्याभरापासून निषेधही सुरु आहे. विरोधकांनी म्हादईप्रश्नी सरकार गंभीर नसल्याचा आरोप करत सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्नही केला होता.

सर्वोच्च न्यायालयासमोर गोव्याचे दोन अर्ज प्रलंबित आहेत. जलवादाने कर्नाटकाला देण्यास सांगितलेल्या पाणी वाटपाच्या निर्णयाला आव्हान व कर्नाटकने केलेली 'बेअदबी' यासंदर्भात अर्ज सर्वोच्च न्यायालयात दोन ते तीन वर्षे प्रलंबित आहेत. हे अर्ज बुधवारी न्यायालयासमोर येणार होते. परंतु, तसा आग्रह धरण्यास राज्य सरकारला अपयश आले आहे. पटलावरील हे अर्ज बुधवारी संध्याकाळी रद्द करण्यात आले. ते आता गुरुवारी सुनावणीस येतील असे अ‍ॅडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी सांगितले होते. दरम्यान आता पुढील आठवड्यात सर्वाेच्च न्यायालयात अंतरिम अर्ज दाखल करणार असल्यांच पांगम यांनी स्पष्ट केलं

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT