Bulletproof vehicles for VIP Dainik Gomantak
गोवा

VIP लोकांसाठी गोव्याला मिळणार बुलेटप्रूफ वाहने

गोवा सरकारकडे स्वत:ची बुलेटप्रूफ वाहने असणार आहे

दैनिक गोमन्तक

अत्यंत महत्वाच्या लोकांसाठी (VIP) गोवा सरकार (Goa Government) बुलेटप्रूफ वाहने (Bulletproof vehicles) देणार आहेत. राज्य मंत्रिमंडळाने दोन टोयोटा फॉर्च्युनर कार बुलेट प्रूफ गिअरसह तयार करण्याचा ठराव मंजूर करण्यात आल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांनी सांगितले.

मुख्यमंत्री म्हणाले, "आम्ही दोन टोयोटा फॉर्च्युनर्स बुलेट प्रूफिंगसह रेट्रो-फिटिंग करत आहोत. गोवा सरकारकडे बुलेट प्रूफ वाहने नव्हती. पण आता सरकारकडे स्वत:ची बुलेट प्रूफ वाहने असणार आहे. त्याला कॅबिनेटमध्ये मंजुरी देखील देण्यात आली आहे. गोवा पोलिसांशी संबंधित दोन वाहने बुलेट प्रूफ आउटफिटिंगसाठी पाठवली जात आहेत. ही वाहने व्हीआयपी लोकांसाठी वापरली जातील.

या आधी राज्यात येणाऱ्या व्हीआयपी आणि व्हीव्हीआयपींच्या सुरक्षित हालचाली सुलभ करण्यासाठी शेजारच्या कर्नाटक आणि महाराष्ट्रातील सुरक्षा संस्थांकडून बुलेट प्रूफ वाहने मागवली जात होती. मात्र आता गोवा सरकारकडे स्वत:ची वाहने येत असल्याने यापुढे राज्यात येणाऱ्या व्हीआयपी आणि व्हीव्हीआयपींच्या सुरक्षेचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT