Speed Breaker|Goa News Dainik Gomantak
गोवा

Goa Government: वाळपईच्या सरकारी आरोग्य केंद्रासमोर गतिरोधक उभारण्याची मागणी!

प्रशासनाचे दुर्लक्ष : प्रशासनाकडून फलक आहे पण गतिरोधक नाही

दैनिक गोमन्तक

Goa Government: वाळपई शहरात दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत आहे. त्यामुळे बेदरकार वाहनचालकांना आवर घालणे कठीण होऊन बसले असून आवश्‍यक ठिकाणी गतिरोधकही उभारणे गरजेचे आहे.

पण वाळपई सरकारी आरोग्य केंद्रासमोर गतिरोधक उभारावा, असे ठरवून तसा फलकही प्रशासनाकडून लावण्यात आला. मात्र, प्रत्यक्षात गतिरोधक उभारलाच नाही. त्यामुळे फलक आहे, गतिरोधक नाही, अशी स्थिती झाली आहे.

गतिरोधक नसल्याने वाहनचालक भरधाव वेगाने वाहने हाकतात. प्रसंगी अपघातही घडतात. वाळपई येथील सोमनाथ काळे यांच्या वाहनाला काही दिवसांपूर्वी भरधाव वाहनाने धडक दिली होती. त्यावेळी रहिवाशांकडून गतिरोधकाची मागणी उचलून धरली होती. आरोग्य केंद्रासमोर गतिरोधक नसल्याने तेथे येणाऱ्या रुग्णांना आणि रुग्णांच्या नातेवाईकांनाही त्रास सोसावा लागतो.

वाळपई सरकारी आरोग्य केंद्रासमोर गतिरोधक उभारणीची मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून केली जात आहे. दीड महिन्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या रस्ता विभागाने या ठिकाणी पाहणी केली होती.

त्यानंतर इस्पितळातील काही अधिकाऱ्यांना येथे बोलावून कुठे गतिरोधक उभारावा, याची सविस्तर माहिती घेऊन पाठपुरावाही करण्यात आला होता. लवकरच गतिरोधक घालावा, असे निर्देश प्रशासनाने दिले होते.

त्यानंतर काही दिवसांनी रस्त्यावर ठिकठिकाणी गतिरोधकासंबंधी फलकही लावण्यात आले. मात्र, कित्येक दिवस उलटले तरी अजून संबंधित खात्याने त्या ठिकाणी गतिरोधक उभारलाच नाही. त्यामुळे येथून येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना फलक आहे व गतिरोधक नाही याचे आश्‍चर्य वाटत आहे.

वाहनांचा अंदाज न आल्याने अपघात !

वाळपई इस्पितळ हे मुख्य इस्पितळ असल्याने अहोरात्र शेकडो रूग्ण तपासणीसाठी ये-जा करत असतात. या रस्त्यावर बसच्या प्रतीक्षेसाठी नागरिक रस्त्यालगत उभे राहतात. त्यामुळे भरधाव येणाऱ्या वाहनांचा अंदाज येत आहे.

आतापर्यंत या ठिकाणी अनेक छोटे-मोठे अपघात घडलेले आहेत. पंधरा दिवसांपूर्वी याच ठिकाणी एका चार चाकी वाहनाने पार्क करून ठेवलेल्या वाहनाला जोरदार धडक दिली होती. त्यात मोटरसायकल पायलट जबर जखमी झाला होता. एवढे होऊनही येथे गतिरोधक उभारले जात नाहीत, त्यामुळे नागिरकांतून संताप व्यक्त होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

जाहिराती थांबवल्या, कार्यक्रमही रद्द! गोवा पोलिसांच्या निर्देशानंतर 'टेल्स ऑफ कामसूत्रा'वर पडदा; आयोजकांनी व्यक्त केली दिलगिरी

Delhi Red Fort Blast: 2023 पासून दिल्ली 'टार्गेट'वर! बॉम्बस्फोटाची तयारी 2 वर्षांपासून सुरू होती; धक्कादायक खुलासा समोर

"अहवालानंतरच बोलेन!", पूजा नाईकच्या आरोपांवर वीजमंत्री ढवळीकरांची प्रतिक्रिया; Watch Video

Bicholim News:डिचोली शहराची सुरक्षा बेभरवशाची; 1 कोटी रुपये खर्चून बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे 'शोभेची वस्तू'!

Bike Stunt Viral Video: यांना कायद्याची भीती नाही? गोव्यात तरूणांची हुल्लडबाजी; चालत्या दुचाकीवर उभं राहून धोकादायक स्टंट, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT