Goa Ration  Dainik Gomantak
गोवा

Goa Ration: ...तोपर्यंत धान्य कोटा उचलणार नाही; वास्कोत नागरिक आक्रमक

Goa Ration: नागरिकांनी वाढीव धान्य कोटा मिळेपर्यंत धान्य कोटा न घेण्याचा निर्णय घेतला आहे.

दैनिक गोमन्तक

Vasco: नागरी पुरवठा खात्याच्या स्वस्त धान्य दुकानात 1 ऑक्टोबर पासून वाढीव अन्नसाठा उपलब्ध करून देण्याची घोषणा सरकारतर्फे करण्यात आली. मात्र स्वस्त धान्य दुकान मालकांना अजून पीओएस (पॉस) मशीनवर अंमलबजावणी केली नसल्याने नागरिकांनी वाढीव धान्य कोटा मिळेपर्यंत धान्य कोटा न घेण्याचा निर्णय घेतला आहे.

नागरी पुरवठा खात्याने ऑक्टोबर महिन्यात वाढीव धान्य कोटा उपलब्ध करण्याचे जाहीर केले, मात्र प्रत्यक्षात ही अंमलबजावणी 1 ऑक्टोबर पासून सुरू होणे क्रमप्राप्त होते. पण स्वस्त धान्य दुकानात देण्यात आलेल्या पीओएस (पॉस) मशीनवर हा धान्य कोटा दाखवत नसल्याने स्वस्त धान्य दुकानदारांना नागरिकांना (रेशन कार्डधारकांना) जाब द्यावा लागतो.

यापूर्वी दारिद्र रेषेवरील रेशन कार्डधारकांना 9 किलो तांदूळ व 5 किलो गहू धान्य कोटा वितरित करण्यात येत होता. आता ऑक्टोबर महिन्यापासून 12 बारा किलो तांदूळ व 8 किलो गहू धान्य कोटा नागरी पुरवठा खात्यातर्फे जाहीर करण्यात आला. पण प्रत्यक्षात आज चार तारीख झाली तरी त्याची अंमलबजावणी करण्यात आली नसल्याने नागरिक स्वस्त धान्य दुकान मालकांना जाब विचारतात.

पीओएस मशीनवर अंमलबजावणी झाली नसल्याने तो कोटा आम्ही देऊ शकत नसल्याचे स्वस्त धान्य दुकान मालक सांगतात. नागरिकांनी वाढीव धान्य कोटा उपलब्ध करून देईपर्यंत धान्य न घेण्याचा निर्णय घेतला आहे. वाढीव धान्य कोटा लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याची मागणी स्वस्त धान्य दुकान मालक तसेच नागरिकांनी केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

जगाचा नकाशा अचूकतेने मांडण्याच्या UN च्या प्रस्तावाला भारताचा पाठिंबा, पण J&K आणि लडाखच्या सीमांबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिला स्पष्ट इशारा

Keri Ambulance Service: केरीला मिळाली 3 दिवसांत 108 रुग्णवाहिका; विधानसभेत आरोलकरांनी प्रश्न उपस्थित करताच सरकारची कार्यवाही

Accident Death: दारूची नशा बेतली जीवावर; दुचाकीवरील ताबा सुटला, नाल्यात पडून 30 वर्षीय युवकाचा मृत्यू

Bank Job: SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 12,000 जागांसाठी होणार मेगाभरती, 250 नव्या शाखा सुरू करण्याचा बँकेचा प्लॅन

Congress Dalit Tribal Support: दलित-आदिवासींची साथ मिळवणे काँग्रेससाठी सोपे नाही! राहुल गांधींसमोर मोठे राजकीय आव्हान

SCROLL FOR NEXT