Visa  Dainik Gomantak
गोवा

Goa Tourism: विदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी गोवा सरकारच्या हालचाली सुरु, केंद्राकडे करणार मोठी मागणी

Goa Tourism: डिजिटल नोमाड व्हिसा विदेशी नागरिकांना एका ठराविक काळासाठी देशात राहण्यासह काम करण्याची मुभा देतो.

Pramod Yadav

पणजी: गोव्यात विदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी राज्य सरकारने हालचाली सुरु केल्या आहेत. ठराविक देशातून येणाऱ्या पर्यटकांना 'व्हिसा ऑन अरायव्हल' सुरु करण्याची मागणी गोवा सरकार केंद्र सरकारकडे करणार आहे. राज्यात विदेशी पर्यटकांची संख्या घटल्यानंतर सरकारने पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी उपाययोजना करण्याचा निर्णय घेतलाय.

केंद्राने डिजिटल नोमाड व्हिसा योजना सुरु करण्याबाबत आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विमानसेवा सुरु करण्याबाबत विचार करावा, अशी विनंती गोवा सरकार करणार आहे.

डिजिटल नोमाड व्हिसा विदेशी नागरिकांना एका ठराविक काळासाठी देशात राहण्यासह काम करण्याची मुभा देतो. गोवा पर्यटनाबाबत सोशल मिडियातून नकारात्मक सूर समोर आल्यानंतर आता राज्य सरकारने ठोस पाऊले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या काही दिवसात सरकार याबाबतचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवणार आहे.

गोव्या ऐवजी पर्यटक थायलंड, व्हिएतनाम, श्रीलंका यासारख्या देशांना पसंती देतायेत असा दावा सोशल मिडियावरुन करण्यात आला होता. गोव्यात येणाऱ्या अनेक पर्यटकांना पर्यटक व्हिसावर राज्यात काम करता येत नाही, त्यामुळे डिजिटल नोमाड व्हिसा सुरु करण्याची मागणी केली जात आहे. तसेच, विमानसेवा मिळाल्यास राज्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढेल, असा दावा पर्यटन विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.

पर्यटनासाठी प्रसिद्ध असणारे अनेक देश व्हिसा ऑन अरायव्हल सारखी सुविधा पुरवतात. अशा देशांसोबत स्पर्धा करायची असल्यास आपल्याला देखील पर्यटकांना ऑनलाईन पद्धतीने व्हिसा उपलब्ध करुन देण्याची सोय केली पाहिजे. यामुळे व्हिसा मिळण्यास लागणारा वेळ कमी होईल, असे तज्ञ सांगतात.

गोव्यात २०२४ साली एक कोटीहून अधिक पर्यटक दाखल झाले. यात ९९.४१ लाख देशी पर्यटक होते. २०२३ मध्ये हीच संख्या ८१.७५ लाख एवढी होती तर, एकूण पर्यटकांची संख्या ८६.२८ लाख एवढी होती, अशी माहिती गोवा पर्यटन खात्याने दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

Calangute Illegal CRZ Construction: कळंगुटमधील अनधिकृत बांधकामांची 'घटका' जवळ! 'एनजीटी'कडून 'जीसीझेडएमए'चा पाडकाम आदेश कायम

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! वार्षिक वेतनवाढ 3 टक्क्यावरून 5 टक्के होणार? पगारात नेमकी किती वाढ होईल? जाणून घ्या

Goa Illegal liquor Seizure: कोंड्याच्या पोत्यांचा आडोसा अन् दारूची तस्करी! पेरणे अबकारी अधिकाऱ्यांच्या दक्षतेमुळे 3 लाख 78 हजारांचा माल जप्त

SCROLL FOR NEXT