Sameer Amunekar
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मध्यमवर्गासाठी मोठी घोषणा केली आहे. 12 लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त करण्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली. नवीन कर प्रणालीमध्ये ही सवलत मिळणार आहे.
केंद्रीय अर्थमंत्र्यांनी केलेल्या घोषणेनुसार, ज्या करदात्यांचे उत्पन्न 12 लाखांपेक्षा कमी असेल त्यांना 100 टक्के सूट मिळेल.
तुमचे उत्पन्न 24 लाखांपेक्षा जास्त असेल, तर तुम्हाला 30 टक्के कर द्यावा लागेल.
ज्या करदात्याचं उत्पन्न 12 लाखांपेक्षा जास्त असेल त्यांना सर्व टप्प्यांच्या टॅक्स द्यावा लागेल. या करदात्यांना 4 लाखांपर्यंत शून्य, 4 ते 8 लाखांपर्यंत 5 टक्के, 8 ते 12 लाखांपर्यंत 10 टक्के असेल.
12 ते 16 लाखांपर्यंत 15 टक्के, 16 ते 20 लाखांपर्यंत 20 टक्के, 20 ते 24 लाखांपर्यंत 25 टक्के तसंच 24 लाखांपेक्षा जास्त करयुक्त उत्पन्नावर 30 टक्क्यांपेक्षा जास्त कर लागणार आहे.
गेल्या अर्थसंकल्पात कराचे दर वाढवण्यात आले होते आणि यावेळी सरकारने मध्यमवर्गीयांसाठी काही दिलासादायक पावले उचलली आहेत.