CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Goa Sand Mining: पारंपरिक रेती उत्खनन व्यवसाय लवकरच सुरु होणार, सरकार प्रयत्नशील; येत्या 2-3 महिन्यांत...

Mumbai High Court Goa sand mining: राज्यातील पारंपरिक रेती उत्खनन व्यवसाय लवकर सुरू करण्यासाठी पर्यावरण परवाना घेण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

राज्यातील पारंपरिक रेती उत्खनन व्यवसाय लवकर सुरू करण्यासाठी पर्यावरण परवाना घेण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. येत्या २-३ महिन्यांत नव्याने पर्यावरण परवान्यासाठी अर्ज करुन गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्‍न सोडवण्याची हमी सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाला दिल्याने कामुर्ली येथील काही रेती व्यावसायिकांची याचिका निकालात काढण्यात आली.

सरकारने राज्यातील ज्या नद्यांमधून रेती उत्खनन करण्यात येते त्याचा जिल्हा सर्व्हे केला असून तो तयार झाला आहे. हा व्यवसाय लवकरात लवकर सुरू व्हावा या सरकारचा हेतू असून त्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. हा प्रश्‍न लवकर सुटावा यासाठीही केंद्र तसेच राज्य पातळीवरून सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. ज्या पारंपरिक रेती उत्खनन व्यावसायिकांनी खाण खात्याकडे अर्ज केले आहेत त्यांना लवकरच परवाने देण्यासाठी प्रयत्न केले जातील. नव्याने पर्यावरण परवान्यासाठी खाण खात्याने हालचाली सुरू केल्या आहेत. पारंपरिक पद्धतीने रेती उत्खनन करणाऱ्यांनाच अगोदर हे परवाने देण्यात येतील असे सरकारच्यावतीने ॲडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी आज खंडपीठाला सांगितले. दरम्यान, राज्यात रेती व चिऱ्यांअभावी बांधकामांवर मोठा परिणाम झाला आहे.

परिसराची आखणी गरजेची

राज्यातील नद्यांमधील रेती उत्खनन कोणत्या भागात शक्य आहे, कोणत्या भागात उत्खनन केल्यास धोका आहे यासंदर्भातचा सर्व्हे सरकारने ‘एनआयओ’ करण्यास दिला होता. त्यांनी यापूर्वीच तो सादर केलेला आहे. त्या सर्व्हेनुसार खाण खात्याने रेती उत्खननच्या परिसराची आखणी करण्याची गरज आहे. त्यापूर्वी त्यांना पर्यावरण परवाना केंद्राकडून मिळणे गरजेचे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT