हैदराबाद येथील सिरीगम नागराजू (३२) याने दाबोळी येथील एका हॉटेलमध्ये गळफास लावून आत्महत्या केली. वास्को पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी हैदराबाद येथील सिरीगम नागराजू हा दाबोळी येथील एका हॉटेलमध्ये उतरला होता.
दरम्यान, बुधवारी त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दुपारी दोन वाजता उघडकीस आले. सकाळपासून रुम उघडत नसल्याने कर्मचारी वर्गाने दरवाजा ठोठावला; पण कोणत्याच प्रकारचा प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी डुप्लिकेट चावीने दरवाजा उघडला.
तेव्हा त्यांना नागराजू पंख्याला गळफास लावून घेतलेल्या स्थितीत आढळला. त्यांनी लागलीच याची माहिती वास्को पोलिसांना दिली. वास्को पोलिस घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा केला. नागराजू याच्या कुटुंबीयांना याविषयी माहिती दिली असून उद्या सकाळी ते गोव्यात पोहोचतील.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.