Goa Electricity Employees Suspended Dainik Gomantak
गोवा

Goa Electricity Employees Suspended: वीज धक्क्यांमुळे मृत्यू प्रकरणांवर मोठी कारवाई!खात्यात निलंबनाचे झटके; 3 साहाय्यक अभियंत्यांसह 14 कर्मचाऱ्यांवर कारवाई

14 Electricity Employees Suspension Goa: दक्षता विभागासह मुख्‍य वीज अभियंत्‍यांनी चौकशीअंती हे पाऊल उचलले. संबंधित अधिकाऱ्यांवर निष्काळजीपणा व कर्तव्यातील त्रुटींचा ठपका ठेवण्यात आला आहे.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: अलीकडच्‍या काळात विद्युतभारीत वाहिन्‍यांशी संपर्क येऊन मृत्‍यू झालेल्‍या वीज कर्मचाऱ्यांच्‍या प्रकरणांची राज्‍य सरकारने गंभीरपणे दखल घेतली असून, गुरुवारी तीन साहाय्‍यक अभियंत्‍यांसह १४ जणांवर निलंबनाची कारवाई केली.

दक्षता विभागासह मुख्‍य वीज अभियंत्‍यांनी चौकशीअंती हे पाऊल उचलले. संबंधित अधिकाऱ्यांवर निष्काळजीपणा व कर्तव्यातील त्रुटींचा ठपका ठेवण्यात आला आहे. निलंबित करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये वास्को विभागातील साहाय्यक अभियंता विक्रम कारेकर, सांगे विभागातील साहाय्यक अभियंता एम्‍लेश गावकर, वेर्णा विभागातील साहाय्यक अभियंता सूरज पालेकर यांचा समावेश आहे.

याशिवाय अन्य कर्मचाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली असून, एकूण १४ कर्मचारी निलंबित झाले आहेत; तर अन्‍य तिघांना ‘कारणे दाखवा’ नोटीस जारी बजावली आहे. अलिकडच्‍या काळात राज्यातील विविध भागांत वीजप्रवाहाचा धक्का लागून काही नागरिकांचा तसेच वीज खात्यातील एका लाईनमनचाही मृत्यू झाला होता. या घटनांनंतर संबंधित विभागातील कामकाज, सुरक्षिततेचे निकष, देखभाल व्यवस्था आणि अधिकाऱ्यांची जबाबदारी याबाबत गंभीर प्रश्‍‍न उपस्थित झाले होते.

त्यानंतर राज्‍य सरकारने या सर्व घटनांची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले होते. दक्षता खात्‍याने प्राथमिक चौकशी पूर्ण केल्यानंतर संबंधित सहाय्यक अभियंत्यांवर प्रशासकीय कारवाई करत त्यांना तात्काळ प्रभावाने निलंबित केले आहे. चौकशीचा अंतिम अहवाल येईपर्यंत ही कारवाई कायम राहणार असल्याचे समजते.

दक्षता खात्‍याचे संचालक अमरसेन राणे यांनी तीन साहाय्‍यक अभियंत्‍यांवर; तर वीज खात्‍याचे मुख्‍य अभियंता स्‍टीफन फर्नांडिस यांनी उर्वरित ११ जणांवर निलंबनाची कारवाई केली. केंद्रीय नागरी सेवा (वर्गीकरण, नियंत्रण व अपील) नियम, १९६५ मधील नियम १०नुसार ही अंमलबजावणी होत आहे. हा नियम हा सरकारी कर्मचाऱ्याला तात्पुरते सेवेपासून दूर ठेवण्यासंबंधी आहे.

आणखीही काहीजण रडारवर

वीजप्रवाहामुळे होणाऱ्या दुर्घटना रोखण्यासाठी वीज वितरण यंत्रणेची नियमित तपासणी, धोकादायक ठिकाणांची तातडीने दुरुस्ती, सुरक्षा मानकांचे काटेकोर पालन आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर आवश्यक कारवाई करण्याबाबत सरकारने स्पष्ट भूमिका घेतली आहे. या प्रकरणातील पुढील चौकशीनुसार आणखी काही अधिकाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कारणे दाखवा नोटीस

उदय कुडाळकर, कार्यकारी अभियंता, कुडचडे

गंगू कुट्टीकर, कार्यकारी अभियंता, वास्‍को

समीर चोडणकर, साहाय्यक अभियंता, डिचोली

निलंबन कारवाई

साहाय्‍यक अभियंते

सूरज पालेकर, वेर्णा कार्यालय

एम्लेश गावकर, सांगे कार्यालय

विक्रम कारेकर, वास्‍को कार्यालय

कनिष्ठ अभियंते

साईश सातार्डेकर, डिचोली कार्यालय

अक्षय रेकडो, कुडचडे कार्यालय

राज सत्यवान मांजरेकर, वास्को कार्यालय

लाईनमन / वायरमन

केदार मांद्रेकर, डिचोली कार्यालय

सुदेश गाड, डिचोली कार्यालय

प्रदीप गड्डी, डिचोली कार्यालय

प्रमोद कालकेकर, डिचोली कार्यालय

श्रीकांत पुजारी, कुडचडे कार्यालय

रितूल नाईक, कुडचडे कार्यालय

घनश्याम परवार, कुडचडे कार्यालय

प्रज्योत गावकर, डिचोली कार्यालय

कोणती प्रकरणे बाधली?

लाईनहेल्पर मंथन आरोसकर वीज धक्का मृत्यू प्रकरण

सांगे येथे वीज धक्क्याने एकाचा मृत्यू

वेर्णा येथे वीज धक्क्याने एकाचा मृत्यू

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT