शॉक लागून वीज कर्मचाऱ्याचा मृत्‍यू; फांद्या छाटताना 'कटर'चा विद्युतभारीत वाहिनीला स्‍पर्श, अस्‍नोड्यातील दुर्घटना

electricity worker dies in asnoda: झाडांच्या फांद्या छाटताना हातातील ‘कटर’चा ३३ केव्ही क्षमतेच्या विद्युतभारीत वाहिनीशी संपर्क आल्याने वीज खात्यातील हेल्पर मंथन आरोसकर (वय २५ वर्षे, रा. म्हावळींगे) याचा जागीच मृत्यू झाला.
electricity worker dies in asnoda
electricity worker dies in asnodaDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: धोकादायक झाडांच्या फांद्या छाटताना हातातील ‘कटर’चा ३३ केव्ही क्षमतेच्या विद्युतभारीत वाहिनीशी संपर्क आल्याने वीज खात्यातील हेल्पर मंथन आरोसकर (वय २५ वर्षे, रा. म्हावळींगे) याचा जागीच मृत्यू झाला. दुर्घटनेनंतर संतप्त झालेल्‍या ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली आणि वीज अधिकाऱ्यांना निष्काळजीपणाबद्दल जाब विचारला.

शुक्रवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास अस्नोडा जलशुद्धीकरण प्रकल्प परिसरात हा प्रकार घडला. झाडांच्या फांद्यांची छाटणी सुरू असताना क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. मंथन शॉक लागून जमिनीवर पडला. लागलीच त्याला डिचोली सामाजिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

यावेळी कुटुंबीयांसह म्हावळींगेतील लोकांनी आरोग्य केंद्राकडे धाव घेतली. मंथनच्‍या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे निर्देश वीज खात्याचे वरिष्ठ अभियंता वल्लभ सामंत यांना दिले आहेत. पोलिसांनी मृतदेह चिकित्सेसाठी गोमेकॉत पाठविला आहे. अपघाताची ही घटना कोलवाळ पोलिस स्थानकाच्या हद्दीत घडल्‍याने कोलवाळ पोलिसांनी गुन्हा नोंद केला.

electricity worker dies in asnoda
Goa Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरला; नागरिकांना तात्पुरता दिलासा, पण पुढील 6 दिवस 'या' भागांत मध्यम सरींचा इशारा

यावेळी संतापलेल्‍या म्‍हावळींगेवासीयांनी प्रश्‍‍नांची सरबत्ती केली. त्‍यामुळे अधिकाऱ्यांना घाम फुटला. पंचनामा न करताच मृतदेह गोमेकॉत का पाठविला, असा खडा सवाल करण्‍यात आला. अखेर सायंकाळी आमदार प्रेमेंद्र शेट आणि पोलिस निरीक्षक एस. कांदोळकर यांच्या उपस्‍थितीत व्हिडिओग्राफीद्वारे पंचनामा करण्यात आला. मंथनच्‍या कुटुंबीयांना न्‍याय देण्‍याचे आश्‍‍वासन देण्‍यात आले. त्‍यानंतर कुटुंबीय मृतदेह स्‍वीकारण्‍यास कुटुंबीय राजी झाले. शनिवारी शवविच्‍छेदन होणार आहे.

घटनास्थळी नेमके काय घडले?

जिथे खांद्यांची छाटणी सुरू होती, त्‍याच्‍या बाजूनेच ११ केव्‍ही व ३३ केव्‍ही क्षमतेच्‍या विद्युतभारीत वाहिन्‍या होत्‍या. पैकी ११ केव्‍ही वाहिनी बंद केली होती. परंतु ३३ केव्‍ही क्षमतेची वाहिनी सुरू होती. त्‍यामुळे अपघात घडला, अशी माहिती काही प्रत्‍यक्षदर्शींनी दिली.

वीज कर्मचाऱ्यांची सुरक्षा धोक्‍यात : तिसरा बळी!

यापूर्वी १९ एप्रिल २०२४ रोजी व्हाळशी-डिचोली येथे लाईनमन; २०२४ मध्येच एका लाईन हेल्परचा, तर आता हेल्पर मंथन आरोसकर याचा शॉक लागून मृत्यू झाला. अडीच वर्षांत सलग घडलेल्या या तीन घटनांमुळे कर्मचारी सुरक्षेचा प्रश्‍‍न ‘रामभरोसे’च असल्‍याचे स्‍पष्‍ट होत आहे. विशेष म्‍हणजे, यापूर्वीच्‍या प्रकरणांतही वीज खात्‍याने विस्‍ताराने खुलासे केलेले नाहीत.

electricity worker dies in asnoda
Goa Crime: सिकेरीत रिसॉर्टजवळ सापडला शाहिद आफ्रिदीचा मृतदेह, कांदोळी समुद्रकिनाऱ्यावरून झाला बेपत्ता

वृक्षतोडीपूर्वी वीजपुरवठा बंद का केला नाही?

विजेचा धक्का लागून डिचोली वीज केंद्राच्या कार्यक्षेत्रात आतापर्यंत वीज खात्याच्या कर्मचाऱ्यांचे ३ बळी गेलेत. आणखी कितीजणांचे बळी घेणार, असा प्रश्‍‍न ग्रामस्थांनी उपस्थित केला.

मंथनला विजेचा शॉक बसला, त्यावेळी त्याठिकाणी अभियंते उपस्थित होते की नाही? वीजपुरवठा बंद करण्यात आला होता की नाही त्याची चौकशी करा, अशी मागणी करण्‍यात आली.

कर्मचारी तर उत्तरे देताना गडबडत होते. वीजवाहिन्यांचे जमिनीपासूनचे अंतर आणि ‘कटर’ची उंची यावरूनही ग्रामस्थांनी शंका उपस्थित केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com