Govind Gawade Dainik Gomantak
गोवा

'क्रीडा अकादमीसाठी गोव्यातील सरकार प्रयत्नशील'

मंत्री गोविंद गावडे: खेळांसाठी व्हिजन डॉक्युमेंट काम सुरू

दैनिक गोमन्तक

पणजी: क्रीडा खात्यातर्फे गोव्यातील विविध खेळांसाठी व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याच्या दिशेने काम सुरू आहे. ज्यामध्ये क्रीडा विज्ञान विद्यापीठाची निर्मिती समाविष्ट असेल. ‘खेलो इंडिया’ आणि ‘फिट इंडिया’सारखे पंतप्रधानांचे उपक्रम तरुण पिढीला प्रोत्साहन देत आहेत. त्यामुळे पुढील महिन्यापासून राज्यात क्रीडा अकादमी सुरू करण्याच्या दृष्टीने राज्य सरकार प्रयत्नशील असल्याची माहिती क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी दिली.

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंना आरक्षण कोट्यातून शासकीय सेवेमध्ये नोकरी दिली जाईल. अधिकाधिक तरुणांना खेळाकडे करीअर करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी ही संधी दिली जाणार आहे.

राज्यात खेळाचा दर्जा वाढवण्यासाठी तसेच गोव्यातील खेळाडू राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकून गोव्याचे नाव व्हावे यासाठी या तरुणांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. या तरुणांना सरकारी खात्यातील आरक्षण कोट्यातून संधी दिल्यास त्यांनाही खेळाकडे वळण्याची आवड लागेल असे ते म्हणाले. गोवा क्रीडा प्राधिकरणाचे (एसएजी) प्रशिक्षक आणि विविध उच्च माध्यमिक शाळांमधील शारीरिक प्रशिक्षण शिक्षकांची बैठक घेतल्यानंतर मंत्री पत्रकारांशी बोलत होते.

जे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळतील त्यांना सरकारी खात्यामध्ये नोकरी दिली जाईल, असे शिक्षक आणि प्रशिक्षकांना राज्य सरकारच्या वतीने खेळाडूंना आश्वासन देण्यास मी सांगितले आहे. हायस्कूलच्या शिक्षकांना पूर्व प्राथमिक शाळेत असलेल्या विद्यार्थ्यांत असलेली प्रतिभा शोधून त्यांना शिकवण्यास सांगितले आहे. खेळ ही जन्मजात प्रतिभा आहे आणि ती जोपासणे हे शिक्षकाचे कर्तव्य आहे, असेही ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT