Mahadayi Water Dispute| Goa  Dainik Gomantak
गोवा

Goa: गोवा सरकारने म्हादई कर्नाटकला विकली- ‘आरजी’चे टीकास्त्र

पिसुर्लेतील सभेमध्ये गावोगावी जनजागृती करण्याचा निर्णय

गोमन्तक डिजिटल टीम

Mahadayi Water Dispute: रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्षातर्फे आज पिसुर्ले येथे म्हादईप्रश्‍नी सभा आयोजित केली होती. या सभेमध्ये उपस्थित वक्त्यांनी गोवा सरकारने म्हादई कर्नाटकला विकली असल्याची टीका केली. तसेच पक्षातर्फे ‘टूगेदर फॉर म्हादई’च्या बॅनरखाली रविवार, १५ जानेवारीपासून राज्यभर व्यापक चळवळ सुरू केली असल्याचे सांगण्यात आले.

त्याचाच एक भाग म्हणून आज पिसुर्लेत सभा घेण्यात आली. या विषयावर जनजागृती करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते आणि पर्यावरणतज्ज्ञांची मदत घेण्यात येणार आहे.

काँग्रेसतर्फे कलश यात्रा-

म्हादईप्रश्‍नी काँग्रेस पक्षाने आज दुपारी वाळपई मतदारसंघातील नानोडा येथे म्हादई नदीचे पूजन करून कलश यात्रेला शुभारंभ केला. ही म्हादई कलश यात्रा संपूर्ण राज्यभर फिरणार आहे. यावेळी नानोडा येथे काँग्रेसचे आमदार कार्लुस फेरेरा, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, वाळपई काँग्रेस गटाध्यक्ष कृष्णा नेने, पदाधिकारी वरद म्हार्दोळकर, अमरनाथ पणजीकर, माजी आमदार प्रताप गावस उपस्थिती होते.

म्हादई नदी पात्रात रेखाटली चित्रे: गुळेली येथे म्हादई नदीच्या पात्रात रविवारी विविध चित्रकार एकवटले आणि त्यांनी म्हादईच्या बचावासाठी चक्क नदी पात्रात चित्रे रेखाटली. यात आबालवृद्धांनी मोठ्या संख्येने भाग घेतला होता. वॉटर कलर चित्रकार संघटनेने आयोजित केलेल्या या उपक्रमात प्रसिद्ध चित्रकारांनीही भाग घेतला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rama Kankonkar Assault: सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर यांच्यावर सहाजणांकडून जीवघेणा हल्ला; हल्लेखोर फरार

घटस्थापनेला नवनिर्वाचित समितीकडे पदभार, 'GCA'च्या नव्या पदाधिकाऱ्यांकडून विकासाची अपेक्षा

ट्रेन रुळावरुन घसरली तर पुन्हा रुळांवर कशी आणली जाते? प्रत्यक्ष व्हिडिओ पाहा Watch

Goa Drug Case: मांडवी एक्स्प्रेसमधून उतरला अन् पोलिसांच्या हाती लागला, 3.5 लाखांच्या अमलीपदार्थांसह नेपाळच्या नागरिकाला अटक

Artificial Intelligence: 'एआय'चा प्रभाव, वकील नामशेष होणार की आणखी सक्षम?

SCROLL FOR NEXT