Forest land SIT probe Dainik Gomantak
गोवा

'त्या' जमिनी परत घेण्‍यासाठी सरकारकडून हालचाली सुरू, महसूल खात्‍याकडून तालुक्‍यांसाठी 'एसआयटी'

Forest land SIT probe: महसूल खात्‍याच्‍या ताब्यात असलेली राखीव वन जमीन खासगी व्यक्ती किंवा संस्थांना बिगर वनवापराच्या उद्देशाने दिली आहे का, याची चौकशी करण्यासाठी राज्‍य सरकारने उपजिल्‍हाधिकाऱ्यांच्‍या अध्‍यक्षतेखाली तालुका स्तरावर विशेष तपास पथके (एसआयटी) स्थापन केली आहेत.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: महसूल खात्‍याच्‍या ताब्यात असलेली राखीव वन जमीन खासगी व्यक्ती किंवा संस्थांना बिगर वनवापराच्या उद्देशाने दिली आहे का, याची चौकशी करण्यासाठी राज्‍य सरकारने उपजिल्‍हाधिकाऱ्यांच्‍या अध्‍यक्षतेखाली तालुका स्तरावर विशेष तपास पथके (एसआयटी) स्थापन केली आहेत. अशा जमिनींची ओळख पटवून त्‍याबाबतचा अहवाल सरकारला सादर करण्‍याचे निर्देश या पथकांना दिले आहेत. खात्‍याने याबाबतचा आदेशही जारी केला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या १५ मे २०२५ च्या आदेशाचे पालन म्हणून प्रत्‍येक तालुक्‍यात ‘एसआयटी’ची स्‍थापना करण्‍यात आली आहे. या पथकांनी ही संपूर्ण प्रक्रिया एका वर्षात पूर्ण करणे आवश्‍‍यक असेल.

तालुका स्तरावरील ‘एसआयटी’चे प्रमुखपद संबंधित तालुक्याच्या उपजिल्हाधिकाऱ्यांकडे असेल. या पथकांमध्ये साहाय्यक वनसंरक्षक, भू-व्यवस्थापन आणि भू-अभिलेख संचालनालयाचा एक प्रतिनिधी आणि गावातील तलाठी यांचा समावेश असेल. तसेच, आवश्यकता भासल्यास अतिरिक्त सदस्यांना सहसदस्य म्हणून समाविष्ट करण्याची तरतूदही केली आहे.

निर्देश असे...

महसूल खात्‍याच्या ताब्यात असलेली कोणतीही राखीव वन जमीन वनिकरणाव्यतिरिक्त इतर कोणत्याही कारणासाठी खासगी व्यक्ती किंवा संस्थेला वाटप करण्यात आली आहे काय, याची तपासणी करणे.

अशा जमिनींची ओळख पटविणे आणि त्यांचा सविस्तर तपशील तयार करणे. ज्यामध्ये जमिनीचे क्षेत्रफळ, स्थान आणि सद्यस्थिती यांचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

1970 चा शांत गोवा अन् 2026 चा हा 'अशांत' अवतार; नक्की काय बदललं गोमंतकात?

अफगाणिस्तान मालिकेपूर्वी टीम इंडियाला 'बॅक टू बॅक' मोठा झटका, विराट पाठोपाठ आता 'हा' स्टार फलंदाजही जखमी; संघाला दुखापतीचं ग्रहण

Goa Bison Attack: "अचानक समोर आला अन्" सुर्ल-पाळी मुख्य रस्त्यावर दुचाकीस्वाराला गव्यानं उडवलं! स्थानिकांमध्ये प्रचंड दहशतीचे वातावरण!

विवाहानंतर नाव बदलणार आहात? मग 'हा' नवीन नियम आधी जाणून घ्या, नाहीतर सरकारी कार्यालयांचे खावे लागतील चकरा

DA Hike: महागाई भत्त्यावर सुद्धा टॅक्स भरावा लागतो? 50 लाख कर्मचाऱ्यांसाठी आयकर विभागाचा काय आहे नियम? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT