Goa And Fundação Oriente Partnership Dainik Gomantak
गोवा

गोवा सरकार अन् पोर्तुगाल कंपनी यांच्यात सामंजस्य करार! कला, सांस्कृतिक अन् शैक्षणिक क्षेत्रांना मिळणार प्रोत्साहन

Goa And Fundação Oriente Partnership: गोवा सरकारने कला आणि संस्कृती विभागामार्फत बुधवारी (12 मार्च) लिस्बनमध्ये फंडाकाओ ओरिएंटे सोबत एक सामंजस्य करार केला.

Manish Jadhav

Goa Government Signs Mou With Fundacao Oriente In Lisbon

गोवा सरकारने गेल्या काही महिन्यात आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक सामंजस्य करार केले आहेत. याचदरम्यान आता, गोवा सरकारने कला आणि संस्कृती विभागामार्फत बुधवारी (12 मार्च) लिस्बनमध्ये फंडाकाओ ओरिएंटे सोबत एक सामंजस्य करार केला. या कराराच्या माध्यमातून गोवा सरकार फंडाकाओ ओरिएंटेसोबत कला, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रात काम करणार आहे. या करारामुळे भारत आणि पोर्तुगालमधील संबंध आणखी मजबूत होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

गोवा सरकार आणि फंडाकाओ ओरिएंटे यांच्यात करार

गोवा सरकार आणि फंडाकाओ ओरिएंटे यांच्यातील करारावर फंडाकाओ ओरिएंटेच्या लिस्बन येथील मुख्यालयात स्वाक्षरी करण्यात आली. गोव्याच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व राज्याचे कला आणि सांस्कृतिक मंत्री गोविंद गावडे यांनी केले, तर फंडाकाओ ओरिएंटे यांचे प्रतिनिधित्व संचालक मंडळाचे अध्यक्ष कार्लोस मोंजार्डिनो आणि मंडळ सदस्य जोआओ अमोरिम यांनी केले. या कराराचा उद्देश गोवा (Goa) आणि पोर्तुगालमधील सांस्कृतिक, शैक्षणिक आणि ऐतिहासिक संबंध मजबूत करणे आहे. मंत्री गावडे यांच्याव्यतिरिक्त आमदार प्रेमेंद्र शेट्ये, अँटोनियो वाझ, क्रिडा-कला आणि सांस्कृतिक खात्याचे सचिव सुनील अंचिपाका आणि कला सांस्कृतिक संचालनालयाचे संचालक सगुन वेळिप उपस्थित होते.

तीन वर्षांसाठी सामंजस्य करार

गोवा सरकारचे सचिव सुनील अंचिपाका आणि फंडाकाओ ओरिएंटेच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष डॉ. कार्लोस मोंजार्डिनो यांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. या कराराचा उद्देश गोवा आणि लिस्बनमधील सांस्कृतिक, शैक्षणिक आणि ऐतिहासिक संबंधांना प्रोत्साहन देणे हा आहे. हा सामंजस्य करार तीन वर्षांच्या कालावधीसाठी वैध असणार आहे. गोवा सरकार आणि फंडाकाओ ओरिएंटे परस्पर संमतीने कराराचा कालावधी तीन वर्षांपेक्षा वाढवू शकतात.

कराराचा उद्देश

सांस्कृतिक देवाणघेवाण आणि कलात्मक सहकार्य.

पोर्तुगीज भाषा अभ्यासक्रम आणि अध्यापन कार्यक्रमांचा विस्तार करणे.

सांस्कृतिक वारशाचे दस्तऐवजीकरण करणाऱ्या ऐतिहासिक संशोधनावर सहयोग करणे.

भारत आणि पोर्तुगाल या दोन्ही देशातील संशोधक, विद्वान आणि शिक्षणतज्ज्ञांसाठी देवाणघेवाण कार्यक्रम सुलभ करणे.

साहित्यिक महोत्सवांना आणि लेखकांच्या देवाणघेवाणीला प्रोत्साहन देणे.

पोर्तुगीज चित्रपट प्रदर्शित करणारे चित्रपट (Movie) महोत्सव आणि प्रदर्शने आयोजित करणे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT