Goa News | Shacks Dainik Gomantak
गोवा

Goa News: सरकारने शुल्क कमी करण्याची शॅकमालकांची अपेक्षा

Goa News: एक दोन दिवसात सरकारने सवलतीचा आदेश जारी केला नाही, तर पर्यटन संचालकांची भेट घेऊ असे शॅक मालकांनी सांगितले.

दैनिक गोमन्तक

Goa News: सरकारने शॅक शुल्कात 50 टक्के सवलत द्यावी, अशी शॅक मालकांची अपेक्षा आहे. शॅक शुल्कात सवलत दिली जाईल, असे सरकारने सांगितले होते, त्याप्रमाणे शासनाने त्वरित कृती करावी. एक दोन दिवसात सरकारने सवलतीचा आदेश जारी केला नाही, तर पर्यटन संचालकांची भेट घेणार असल्याचे शॅक मालकांनी सांगितले.

काही दिवसांपूर्वी शॅक मालकांनी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांची भेट घेऊन त्यांना शुल्कात सवलत देण्याची मागणी केली होती. शॅक मालक कल्याण सोसायटीचे अध्यक्ष क्रुझ कार्दोज म्हणाले, की जीएसटी व इतर करासह आणखी 10 टक्के जादा शुल्क भरण्यास सांगितले होते.

शिवाय शॅक मालकांना आणखी जादा 150 टक्के कचरा कर म्हणून भरणा करण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे 50 टक्के शॅक मालकांनी हे शुल्क भरल्याचे क्रुझ कार्दोज यांनी सांगितले. काही जणांनी अजून शुल्क भरलेले नाही. शुल्क भरण्याची अंतिम तारीख 4 नोव्हेंबर आहे. मात्र त्यापूर्वी सरकार शुल्कात सवलत देईल, अशी त्यांची अपेक्षा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Calangute Baga: उत्तर गोव्यातील प्रसिद्ध भाग दाखवला रेड लाईट एरिया; Youtuber ने हात जोडून मागितली माफी

Goa Today's News Live: बेपत्ता राजवीर सापडला; काणका पर्रा येथे लागला शोध

Sudarsan Pattnaik: 'तर गोव्यात अनेक वाळू शिल्प कलाकार घडतील'! पद्मश्री सुदर्शननी केले गोवन संस्कृतीचे कौतुक, म्हणाले की..

Dream Meaning: मी रात्री गाढ झोपलो आणि.....नशीब!! स्वप्नं आपल्याला काही सांगू पाहतायत का?

Saint Xavier Exposition: मुंबईतील अमेरिकेच्या वाणिज्य दूताने घेतले संत फ्रान्सिस झेवियर यांच्या शवाचे दर्शन; गोव्याचे केले विशेष कौतुक

SCROLL FOR NEXT