पणजी: आल्तिनो-पणजी येथील मैदानावर आज करण्यात आलेल्या लिलावात सरकारने विनावापर असलेली १७० वाहने विकली. यातून सरकारला १.०७ कोटींचा महसूल मिळाला.
गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळाकडे या लिलावाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. हे तिसरे लिलाव होते. वित्त खाते या लिलावाचे समन्वय करत आहे. या मेळ्यात राज्य सरकारच्या विविध विभागांतील आणि स्वायत्त संस्थांमधील १७० वाहनांचा समावेश होता.
ही वाहने एकूण ५९ लॉटमध्ये विभागली गेली होती. यातील १२८ वाहने १५ वर्षांहून अधिक जुनी असल्याने ती थेट भंगार धोरणांतर्गत नोंदणीकृत स्क्रॅपिंग यंत्रणांसाठी खुली करण्यात आली होती. उर्वरित ४२ वाहने १५ वर्षांखालील असल्याने ती सर्वसामान्य नागरिकांना लिलावात खरेदीसाठी खुली होती.
या लिलावात १३५ बोलीदार सहभागी झाले होते. या लिलाव प्रक्रियेमुळे वाहन निःसारण प्रक्रियेत पारदर्शकता, कार्यक्षमता आणि पर्यावरणपूरक दृष्टिकोन अधोरेखित झाला.
वाहन भंगार धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी गोव्यात सुरू करण्यात आलेला हा उपक्रम परिपक्व प्रशासन व अर्थव्यवस्था आणि राष्ट्रीय वाहन स्क्रॅपिंग धोरणाशी सुसंगत कार्यपद्धती यांचे उदाहरण ठरला आहे. यामुळे जुन्या व प्रदूषणकारी वाहनांची विल्हेवाट सुरक्षित पद्धतीने लावण्यास चालना मिळते. इतर राज्यांसाठीही गोव्याने आदर्श निर्माण केला आहे, असे राज्याचे मुख्य सचिव डॉ. व्ही. कांदावेलू यांनी ‘गोमन्तक’ला सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.