Government Schemes | Goa News  Dainik Gomantak
गोवा

Government Schemes: सरकारी योजनांचा गैरफायदा 'खरी कुजबुज'

सरकारने गरजवंतांसाठी मुख्यमंत्री देवदर्शन यात्रा सुरू केली आहे.

दैनिक गोमन्तक

सरकारमार्फत काही चांगल्या योजना सुरू केल्या जातात, पण काही स्वार्थी व आपमतलबी लोक या योजनांचा गैरफायदा घेतात आणि त्या सरकारी योजना बदनाम होतात. आपल्या गोव्यात दोन मजली घर असलेले लोक दारिद्र्य रेषेखाली(बीपीएल) म्हणून नोंद झाल्याची उदाहरणे आहेत.

किती तरी धनाढ्य लोकांनी दयानंद सामाजिक योजना, गृह लक्ष्मी, लाडली लक्ष्मीसारख्या योजनांचा गैरफायदा घेतला याचे पुरावे बाहेर पडले आहेत. आता सरकारने गरजवंतांसाठी मुख्यमंत्री देवदर्शन यात्रा सुरू केली आहे.

मात्र, पहिल्याच यात्रेत अनेक धनाढ्य लोक गेल्याची चर्चा रंगत आहे. सरकारने जरी या योजनेचा लाभ घेणाऱ्यांसाठी मिळकतीची अट घातली नसली, तरी ज्यांना शक्य आहे त्यांनी मोफत देवदर्शन करून गरजवंताचा हक्क का हिरावून घ्यावा?

मुद्दा विमानतळाच्या नावाचा

मोपा विमानतळाच्या नावाचा मुद्दा सध्या बराच चर्चेत आहे. नावाबाबत मतैक्य तर नाहीच, उलट व्यक्ती तितक्या प्रवृत्ती या म्हणीनुसार अनेक नावे अनेकांकडून पुढे आल्याने त्यात सरकारचेच फावेल असे दिसते, पण मुद्दा तो नाही.

या प्रश्‍नावरून अनेकांना भाऊसाहेबांच्या योगदानाची आठवण झाली असून ते पेडण्यात जमून सुदिनरावांनी या प्रकरणी सरकारवर दडपण आणावे, प्रसंगी सरकारातून बाहेर पडावे अशी मागणी करत आहेत, पण प्रत्यक्षात सुदिनराव असा सल्ला गांभीर्याने घेणारच नाहीत, असे त्यांचेच समर्थक म्हणतात.

‘डबल इंजिन’मधला विरोधाभास

एरवी पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठी पुढे असणारे गोवेकर इको ‘सेन्सिटिव्ह झोन’ला विरोध का करतात हे अनाकलनीय आहे. कारण राज्याचे वन क्षेत्र आणि खासगी जंगल ६० टक्क्यांपेक्षा जास्त आहे.

या वनांच्या संरक्षणाचे काम अत्यंत चांगल्या पद्धतीने होत आहे. या वनांना लागून असणाऱ्या ‘बफर झोन’ किंवा जैवसंवेदनशील जागा सोडण्यास विरोध का केला जातो? याला आता लोकांबरोबर राहणार असे सांगत राज्य सरकारनेही या झोनला विरोध करत यातून गोव्याला वगळा अशी मागणी केली आहे.

त्यामुळे हा राज्य आणि केंद्र सरकारच्या ‘डबल इंजिन’मधला विरोधाभास नव्हे का?

वाळपईच्या बाबांची प्रशंसा

मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर सावंत सरकारात उपमुख्यमंत्रिपद मिळालेल्या सुदिन ढवळीकर व विजय सरदेसाई यांना नंतर नेमके का वगळले गेले हे एक कोडेच राहिले आहे.

त्या अपमानाचे उभयतांनी नंतर जरी डूख धरलेले असले तरी नंतरच्या निवडणुकीने ढवळीकर यांना नमते घेण्यास भाग पाडले व ते मंत्रीही झाले. पण सरदेसाईंचे तसे झाले नाही. त्यामुळे ते भाजपवर व विशेषतः मुख्यमंत्र्यांवर सतत आग ओकताना आढळतात.

नीती आयोगाच्या अहवालावरील त्यांच्या पत्रकार परिषदेतून हीच आग दिसून आली. मात्र, बोलण्याच्या ओघात त्यांनी जी वाळपईच्या बाबांची प्रशंसा करून ते कसे मुख्यमंत्री पदासाठी योग्य आहेत हे सांगितल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. त्यानंतर लगेच छोट्या खाशांनी केलेली सारवासारव हे नव्या राजकीय समीकरणाचे संकेत तर नव्हेत ना?

भाजपमध्ये टार्गेट

भाजपमध्ये सध्या पक्षांतर्गत आपल्याच सदस्यांना काही नेतेमंडळी लक्ष्य करत आहेत. यासाठी काही संघटनांचा वापर नेतेमंडळींकडून केला जात आहे. विशेष म्हणजे पक्षातील अल्पसंख्याक समुदायातील सदस्य यांच्या निशाण्यावर असून त्यांची कोंडी करण्यात येत आहे.

मुख्य म्हणजे लक्ष्य असलेल्या सदस्यांना या नेत्यांबद्दल उघडपणे काहीही करता येत नसल्याने ‘त्यांची' गोची झाली आहे. आता केवळ मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे आपली मदत करणार या आशेवर ही मंडळी पक्षात टिकून राहिली आहे.

‘सेकंड इन कमांड’ आवश्‍यक

इंग्रजी भाषेत ‘सेकंड इन कमांड’ म्हणजे दुसऱ्या स्थानावर असलेली व्यक्ती. उदाहरणार्थ उद्या मुख्यमंत्री किंवा अधिकारी रजेवर गेल्यास त्यांच्या अनुपस्थित दुसऱ्या क्रमांकावर असलेली व्यक्ती ताबा घेते, परंतु गोव्यातील सरकारी कार्यालयांमध्ये हा नियम लागू नसल्याचे दिसते.

संचालक, उपसंचालक किंवा कर्मचारी रजेवर गेल्यास ते सेवेत रुजू होईपर्यंत त्यांच्या वाट्याचे काम ताटकळत ठेवण्याचे प्रकार घडत आहेत. त्या अधिकाऱ्याकडून महत्त्वाची माहिती घ्यायची असल्यास त्यांची वाट बघण्याखेरीज पर्याय नसतो.

पोलिसांची तंदुरुस्ती

राज्यात रविवारी पार पडलेल्या ‘आयर्न मॅन’ या अत्यंत दमछाक आणि कसोटी पाहणाऱ्या स्पर्धेत गोवा पोलिसांच्या तब्बल चौदाजणांनी भाग घेऊन ती वेळेत जिंकली. एरवी पोलिसांच्या कार्यकौशल्यावर सातत्याने टीका होत असली, तरी अशा स्पर्धांमध्ये पोलिसांनी घेतलेला सहभाग आणि दाखविलेली तंदुरुस्ती ही नक्कीच आशादायी आहे.

याचा गुन्हेगारीवर वचक बसविण्यासाठीही उपयोग व्हावा अशी चर्चा आता होऊ लागली आहे.∙∙∙राज्यात रविवारी पार पडलेल्या ‘आयर्न मॅन’ या अत्यंत दमछाक आणि कसोटी पाहणाऱ्या स्पर्धेत गोवा पोलिसांच्या तब्बल चौदाजणांनी भाग घेऊन ती वेळेत जिंकली.

एरवी पोलिसांच्या कार्यकौशल्यावर सातत्याने टीका होत असली, तरी अशा स्पर्धांमध्ये पोलिसांनी घेतलेला सहभाग आणि दाखविलेली तंदुरुस्ती ही नक्कीच आशादायी आहे. याचा गुन्हेगारीवर वचक बसविण्यासाठीही उपयोग व्हावा अशी चर्चा आता होऊ लागली आहे.

खड्ड्यांचे उजळले भाग्य!

महापालिका कार्यक्षेत्रात अजूनही खड्डेच खड्डे आहेत. एका बाजूला स्मार्ट सिटी आणि मलनिस्सारण विभागातर्फे रस्ता खोदकाम सुरू आहे. इफ्फीमुळे भाऊसाहेब बांदोडकर मार्ग विद्युत रोषणाईने न्हाऊन निघेल.

बांदोडकर मार्गाजवळील जे मार्ग आहेत, त्यावरील खड्डे नुकतेच बुजवण्यात आले आहेत. शहरातील रस्त्यावर पक्के हॉटमिक्स कधी व्हायचे ते होतील, पण अनेक महिन्यांपासून आपले अस्तित्व टिकवून असणारे खड्डे अखेर बुजवले गेले आहेत.

त्यामुळे किमान इफ्फीमुळे तरी हे खड्डे बुजले म्हणण्याची वेळ या मार्गावरून नियमितपणे ये-जा करणारे वाहनचालक नक्कीच म्हणत असतील.∙∙∙महापालिका कार्यक्षेत्रात अजूनही खड्डेच खड्डे आहेत. एका बाजूला स्मार्ट सिटी आणि मलनिस्सारण विभागातर्फे रस्ता खोदकाम सुरू आहे. इफ्फीमुळे भाऊसाहेब बांदोडकर मार्ग विद्युत रोषणाईने न्हाऊन निघेल.

बांदोडकर मार्गाजवळील जे मार्ग आहेत, त्यावरील खड्डे नुकतेच बुजवण्यात आले आहेत. शहरातील रस्त्यावर पक्के हॉटमिक्स कधी व्हायचे ते होतील, पण अनेक महिन्यांपासून आपले अस्तित्व टिकवून असणारे खड्डे अखेर बुजवले गेले आहेत.

त्यामुळे किमान इफ्फीमुळे तरी हे खड्डे बुजले म्हणण्याची वेळ या मार्गावरून नियमितपणे ये-जा करणारे वाहनचालक नक्कीच म्हणत असतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Chimbel Unity Mall: युनिटी मॉलविरोधात रणशिंग! ग्रामस्थांचा मुख्यमंत्र्यांवर दिशाभूल केल्याचा खळबळजनक आरोप; राजकीय बहिष्काराचा एल्गार

T20 World Cup 2026: आयसीसीने शिकवला धडा! भारताशी पंगा घेणं बांगलादेशला पडलं महाग; वर्ल्ड कपमधून पत्ता कट

Surya Gochar 2026: आत्मविश्वास वाढणार, शत्रू नमणार! फेब्रुवारीत सूर्याचं 'ट्रिपल गोचर', 'या' राशींच्या लोकांसाठी सुवर्णकाळ

World Legends Pro T20: क्रिकेटचे 'लीजंड्स' गोव्यात! 6 संघ, 10 दिवस अन् वेर्णाच्या मैदानावर रंगणार टी-20चा थरार

Army Vehicle Accident: जम्मू-काश्मीरमध्ये काळजाचा ठोका चुकवणारी दुर्घटना! लष्कराच्या वाहनाचा भीषण अपघात; 10 जवान शहीद VIDEO

SCROLL FOR NEXT