Kala Academy Goa  Dainik Gomantak
गोवा

Goa Kala Academy: मंत्री गोविंद गावडेंना मोठा झटका, कला अकादमी नुतनीकरण कंत्राटाचे होणार मुल्यांकन

60 दिवसांत अहवाल देणार समिती

Akshay Nirmale

Goa Kala Academy: गोवा कला अकादमीच्या नुतनीकरणाचे काम अनेक दिवसांपासून रखडले आहे.

गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात इफ्फीला सुरवात होण्यापुर्वी कला अकादमीचे काम डिसेंबरमध्ये पूर्ण होणार असे मुख्यमंत्र्यांसह सांस्कृतिक मंत्र्यांनीही सांगितले होते. तथापि, ती मुदत कधीच उलटून गेली आहे.

दरम्यान, आता कला अकादमीच्या नुतनीकरण कामाच्या कंत्राटाचेच मुल्यांकन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, हिवाळी अधिवेशनात सरकारकडून याबाबत माहिती देण्यात आली.

कला अकादमीच्या नुतनीकरण कामाच्या कंत्राटाचे मुल्यांकन करण्यासाठी सरकारने एक समिती नेमली आहे. डॉ. आशिष रेगे, संदीप प्रभू चोडणेकर आणि डॉ. के. जी. गुप्ता यांची समिती स्थापन केली आहे.

ही समिती अकादमीच्या आवारातील नुतनीकरण याशिवाय इतर कामांचीही तपासणी करणार आहे. प्राथमिक चौकशीसाठी या परिसराचे निरीक्षणही समिती करेल. समिती 60 दिवसांमध्ये आपला अहवाल सरकारला सादर करणार आहे.

दरम्यान, यापुर्वी कला आणि सांस्कृतिक मंत्री गोविंद गावडे यांनी नूतनीकृत कला अकादमी 8 डिसेंबर रोजी होणार असल्याचे म्हटले होते. तसेच इफ्फी साठीदेखील कला अकादमी संकुल उपलब्ध होईल, असे सांगण्यात आले होते.

कला अकादमीचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी शासनाने संबंधित कंत्राटदारावर दबाव आणला नाही. दर्जेदार कामाची मागणी करत असल्याने आम्हाला थोडा संयम बाळगण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले होते.

कला अकादमी संकुलातील ब्लॅक बॉक्समध्ये बदल करून तो पुन्हा मूळ डिझाइनमध्ये आणल्याची माहिती आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant Record: ऋषभ पंतने 'कॅप्टन कूल'चा रेकॉर्ड मोडला! आता क्रिकेटच्या देवाचा नंबर! करणार 'ही' मोठी कामगिरी

WWE सुपरस्टारची गोळ्या घालून निर्घृण हत्या, 18 वर्षांची कारकीर्द एका क्षणात संपली

Wild Vegetables: पावसाळ्यातील किमया! गोव्यातील चविष्ट रानभाज्या..

'कोणतरी मरत नाही तोपर्यंत सरकार लक्ष देणार नाही'; मनसे नेत्याने शेअर केला कशेडी बोगद्याचा धक्कादायक व्हिडिओ

Shravan 2025: 'श्रावण सोमवार' व्रत करणार असाल तर 'हे' नक्की वाचा! काय करावं, काय टाळावं? पूजेचे संपूर्ण नियम

SCROLL FOR NEXT