Pernem: गोव्यात चोरलेल्या मोबाईल फोनसह एका चोरट्याला पोलिसांनी चक्क हिमाचल प्रदेशात जाऊन अटक केली आहे. पेडणे पोलिसांनी ही कामगिरी पार पाडली आहे. पोलिसांच्या या कारवाईचे कौतूक होत आहे. (Goa Police Arrested Mobile Thief From Himachal Pradesh )
पोलिसांनी तंत्रज्ञानाच्या मदतीने या चोरट्याचा माग काढला. फोन ट्रेस करण्यासाठी पोलिसांनी सर्व यंत्रणा पणाला लावली होती. आणि थेट गोव्यापासून हजारो किलोमीटर दूर असलेल्या हिमाचल प्रदेशातून अखेर या मोबाईल चोरट्याला ताब्यात घेण्यात आले आहे.
संबंधित फोन आरंबोळ येथून चोरीला गेला होता. या फोनची किंमत २५ हजार रूपये इतकी होती. कमलेश कुमोत राम (वय 43) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. तो हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथील रहिवासी आहे.
इलेक्ट्रॉनिक सर्व्हेलन्सद्वारे पोलिस या फोनच्या हालचालींवर लक्ष ठेऊन होते. हा फोन कुल्लू येथे असल्याचे लक्षात आल्यावर पोलिसांच्या एका पथकाने कारवाई करत कमलेश याला फोनसह अटक केली आहे.
त्याच्याकडून फोन जप्त करण्यात आला आहे. आणखी काही फोन चोऱ्यांमध्ये त्याचा हात आहे का, हे चौकशीतून तपासले जात आहे.
ख्रिसमस आणि न्यू ईयर गोव्यात साजरे करण्याला अनेक जण प्राधान्य देत असतात. त्यासाठी देशभरातून पर्यटकांचा ओढा गोव्याकडे येत असतो.
यंदाही त्याची प्रचिती आली. तथापि, ख्रिसमस आणि न्यू ईयर काळात उत्तर गोव्यताील गर्दीच्या समुद्र किनाऱ्यांसह विविध ठिकाणांहून मोठ्या प्रमाणात मोबाईल फोन्स चोरीला गेल्याच्या तक्रारी दाखल झाल्या होत्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.