Goa School Closures Dainik Gomantak
गोवा

Goa School: गोव्यातील 50 सरकारी शाळा बंद! शिक्षकांच्‍या 347 जागा रिक्त; नागरिकांचे खासगी शाळांना प्राधान्य

Goa School Closures: ज्‍या शाळा बंद पडल्‍या, त्‍यांच्‍या इमारती काही संस्‍थांना तसेच पंचायत, महिला बाल कल्‍याण खात्‍याला अंगणवाड्या चालवण्‍यासाठी देण्‍यात येत आहेत, असे मुख्‍यमंत्री सावंत यांनी म्‍हटले आहे.

Sameer Panditrao

पणजी: गेल्‍या पाच वर्षांत राज्‍यातील ५० सरकारी प्राथमिक शाळा बंद पडलेल्‍या आहेत, तर चालू वर्षी सरकारी शाळांमध्‍ये शिक्षकांच्‍या ३४७ जागा रिक्त असल्‍याची माहिती मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आमदार एल्‍टन डिकॉस्‍ता आणि उल्‍हास तुयेकर यांनी विधानसभेत विचारलेल्‍या वेगवेगळ्या प्रश्‍नांच्‍या उत्तरांतून दिली.

गेल्‍या पाच वर्षांत राज्‍यातील एकूण किती सरकारी प्राथमिक शाळा बंद पडल्‍या, त्‍याची कारणे काय आणि ज्‍या शाळा बंद पडलेल्‍या आहेत, त्‍यांच्‍या इमारतींचा सरकार कशापद्धतीने वापर करीत आहे, असे प्रश्‍न विचारले होते.

त्‍यावरील उत्तरात मुख्‍यमंत्री डॉ. सावंत यांनी २०२०–२१ ते २०२४–२५ या काळात राज्‍यातील एकूण ५० शाळा बंद पडलेल्‍या आहेत. ज्‍या शाळा बंद पडल्‍या, त्‍यांच्‍या इमारती काही सामाजिक संस्‍थांना तसेच पंचायत, महिला आणि बाल कल्‍याण खात्‍याला अंगणवाड्या चालवण्‍यासाठी देण्‍यात येत आहेत, असे मुख्‍यमंत्री डॉ. सावंत यांनी म्‍हटले आहे.

आमदार उल्‍हास तुयेकर यांनी राज्‍यात सद्यस्‍थितीत किती सरकारी प्राथमिक शाळा कार्यरत आहेत, तेथे शिक्षकांची किती पदे रिक्त आहेत आणि ती भरण्‍यासाठी सरकारने कोणती पावले उचलली आहेत, असे प्रश्‍न विचारले होते. त्‍यावर राज्‍यात सध्‍या ६७९ सरकारी प्राथमिक शाळा कार्यरत आहेत. त्‍यात शिक्षकांची ३४७ पदे रिक्त आहेत. याशिवाय प्रशिक्षित इंग्रजी शिक्षकांची १४ पदेही रिक्त आहेत. रिक्त पदे भरण्‍याचा प्रस्‍ताव शिक्षण खात्‍याने कर्मचारी भरती आयोगाला पाठवला आहे, असे मुख्‍यमंत्री डॉ. सावंत यांनी म्‍हटले आहे.

बालरथ, स्‍थलांतरामुळे शाळा बंद

विद्यार्थ्यांची घटती संख्‍या, अनुदानित शाळांमधील बालरथ तसेच नागरिकांचे मोठ्या प्रमाणात होत असलेले स्‍थलांतर, पालकांकडून खासगी शाळांना देण्‍यात येणारे प्राधान्‍य आदी कारणांमुळे राज्‍यातील सरकारी प्राथमिक शाळा बंद पडत आहेत, असेही मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी उत्तरात म्‍हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT