Goa Government | Goa CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Goa Government: गोव्यात आयटीच्या विस्ताराची जबाबदारी युवकांची- प्रमोद सावंत

Goa Government: सरकारने युवकांच्या विकास कौशल्यासाठी अनेक आयटीआय आणि आयडीसीकडे करार केले आहेत.

दैनिक गोमन्तक

Goa Government: गोव्यात आयटी क्षेत्र विस्ताराची जबाबदारी युवकांवर असून त्यांना कौशल्य विकासासाठी सरकारतर्फे सर्वतोपरी सहकार्य दिले जाईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. गोवा चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्रीजने मडगावमध्ये रवींद्र भवनात आयोजित केलेल्या गोवा डेव्हलपर्स मेळाव्याच्या समारोप सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते.

गोव्याकडे आयटी हबचे डेस्टीनेशन बनण्याची क्षमता आहे. आयटी हे रोजगार निर्मितीचे नवे क्षेत्र आहे व युवकांनी त्याकडे आकर्षित होणे गरजेचे आहे. आयटी, कृषी, फलोत्पादन, दुग्ध व्यवसायासारख्या उद्योगात कौशल्य विकासाची आवश्यकता आहे, असे ते पुढे म्हणाले.

मोपा विमानतळ हे भारताचे लॉजिस्टीक हब होणार असल्याने तेथे युवकांसाठी रोजगाराच्या अनेक संधी असतील. सरकारने युवकांच्या विकास कौशल्यासाठी अनेक आयटीआय व आयडीसीकडे करार केले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या मनातील नवभारत निर्माण करताना युवकांना सामावून घेण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी युवकांनी आपली तयारी ठेवावी, असेही ते म्हणाले. नितीन कुंकळयेकर म्हणाले, की गोव्यात आयटीचा विकास हे एक आव्हान आहे. जीसीसीआय, सरकार व औद्योगिक आस्थापनांनी एकत्र येऊन आयटीच्या विस्तारासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

जीसीसीआयचे अध्यक्ष राल्फ डिसोझा यांनी सर्वांचे स्वागत करताना सांगितले, की गोव्यात आयटी, पर्यटन क्षेत्रात 6 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून त्याद्वारे 15 हजार नोकऱ्यांची व्यवस्था होणार आहे.

मला माझ्या खुर्चीची चिंता नाही: मुख्यमंत्री

युवकांनी सदैव मागे न राहता पुढे येण्याचा प्रयत्न करावा असे सांगून मुख्यमंत्र्यांनी सभागृहात जे अगदी मागे विद्यार्थी बसले होते, त्यांनी पुढील आसनांवर येण्यास सांगितले. पहिल्या रांगेत बसल्यावरसुद्धा मंचावर कसे पोहचाल यासाठी प्रयत्न करावा.

माझी खुर्चीसुद्धा कुणाला हवी असल्यास ती घेता येईल. मला माझ्या खुर्चीची चिंता नाही, पण युवकांनी जीवनात काहीतरी साध्य करायचे असल्यास त्यांनी मागे न राहता पुढच्या रांगेत येण्याचा प्रयत्न करावा, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

कुस्तीच्या आखाड्यात जिंकली, पण आयुष्याच्या पटावर हारली! सासरच्या त्रासाला कंटाळून 3 लेकरांसह महिला पैलवानानं उचललं टोकाचं पाऊल; 2 मुलांचा मृत्यू, 1 गंभीर

Goa Sports: गोव्याचे खेळाडू पदकासाठी सज्ज; जम्मू-काश्मीरमध्ये रंगणार राष्ट्रीय सेपॅक टाकरो स्पर्धा

SCROLL FOR NEXT