53rd IFFI Festival Goa 2022 Dainik Gomantak
गोवा

53rd IFFI Goa: यंदाचा 'इफ्फी' ठरणार अविस्मरणीय

53rd IFFI Goa: महोत्सवासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा उभारण्याचे काम राज्य सरकारच्या मनोरंजन संस्थेच्यावतीने पूर्ण होत आले आहे.

दैनिक गोमन्तक

53rd IFFI Goa: कोविडनंतर इफ्फीत येण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक आतुर आहेत. हा महोत्सव आत्तापर्यंतच्या महोत्सवापेक्षाही वेगळा आणि आठवणीतील ठरू शकतो. या महोत्सवासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा उभारण्याचे काम राज्य सरकारच्या मनोरंजन संस्थेच्यावतीने पूर्ण होत आले आहे. या महोत्सवासाठी 18 तारखेपासून राज्यात पाहुणे येण्यास प्रारंभ होईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

इफ्फीच्या आयोजनाविषयी ठिकठिकाणच्या कामांची पाहणी मुख्यमंत्र्यांनी केली. ऑयनॉक्स परिसरात आल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. याप्रसंगी गोवा मनोरंजन संस्था (ईएसजी) मुख्य कार्यकारी अधिकारी स्वेतिका सचन, सरव्यवस्थापक मृणाल वाळके, ईएसजी संचालक शर्मद रायतूरकर, जिल्हाधिकारी मामू हागे, जिल्हा पोलिस अधीक्षक व इतर मान्यवरांची उपस्थिती होती.

मुख्यमंत्री म्हणाले, राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाने (एनएफडीसी) यंदा फिल्म बझारचा एक भाग म्हणून युथ होस्टलच्या बाजूच्या जागेत वेगळी व्यवस्था केली आहे. याठिकाणी ज्यांनी नोंदणी केलेली नाही, अशा लोकांनाही जाता येईल. त्याशिवाय या महोत्सवात विविध कलाकारांचा सहभागही असणार आहे.

मनोरंजन संस्थेच्यावतीने ज्या पायाभूत सुविधा निर्माण करून द्यायच्या आहेत, त्या पूर्णत्वाकडे आल्या असून दोन-चार दिवसांत त्या पूर्ण होऊन आम्ही हा सर्व भाग एनएफडीसीकडे सुपूर्द करू, असेही त्यांनी सांगितले.

गोवा विभागात यंदा दहा लघुपट

इफ्फीतील गोवा (Goa) विभागात यंदा दहा लघुपट आणि एक चित्रपट मिळालेला आहे. भारतीय चित्रपटांची निवड जे ज्युरी मंडळ करते, त्यांच्याकडूनच गोव्यातील लघुपट व चित्रपटांची निवड करून घेतली जाते. इफ्फीचा गोव्यातील चित्रपट निर्मात्यांना फायदा व्हावा यासाठी चार वेगवेगळ्या विषयांवर मास्टर क्लास ठेवलेले आहेत.

तेही खास करून गोव्यातील चित्रपट निर्मात्यांसाठी आहेत. त्यातून चित्रीकरण, स्क्रिप्ट रायटिंग, निर्देशन, अभिनय अशा विषयांवर 23 ते 26 तारखांना हे क्लास होणार आहेत. राज्यातील चित्रपटसृष्टीशी निगडित असलेल्यांनी या क्लासना उपस्थित रहावे, असे आवाहन रायतूरकर यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa News Live: ओपा जल शुद्धीकरण प्रकल्पाजवळ ट्रक दरीत कोसळला

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

SCROLL FOR NEXT