Goa Government | Pramod Sawant Dainik Gomantak news
गोवा

Goa Government: आत्मनिर्भर शेतकऱ्यांचे लक्ष्य; कंपन्या स्थापणार- प्रमोद सावंत

Goa Government: राज्यात बारा शेतकरी कंपनी स्थापन करुन नव्या योजना हाती घेण्यामागे प्रत्येकाने आत्मनिर्भर व्हावे हा उद्देश आहे.

दैनिक गोमन्तक

Goa News: कृषीप्रधान गोव्यात युवा पिढीने विशेष रुची दाखवताना आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून प्राकृतिक सेंद्रिय शेतीवर भर देण्याची गरज आहे. फार्मर्स कंपनीच्या माध्यमातून अनेक बाबतीत शेतकरी वर्गाला मोठी उपलब्धी गाठणे शक्य होईल, असा विश्‍वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल व्यक्त केला.

केंद्र व राज्य सरकारच्या सहकार्याने राज्यातील पहिल्या बिचोलिम प्रोग्रेसिव्ह फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेडचे मार्केट यार्ड साखळी येथे उद्‍घाटन करण्यात आले. यानंतर रवींद्र भवनात आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट, कृषी खात्याचे संचालक नेव्हिल अल्फान्सो, कंपनीचे संचालक विश्‍वंभर गावस आदी उपस्थित होते.

‘राज्यात बारा शेतकरी कंपनी स्थापन करून नव्या योजना हाती घेण्यामागे प्रत्येकाने आत्मनिर्भर व्हावे हा उद्देश आहे. गोवा नैसर्गिक शेतीसाठी प्रसिद्ध आहे. शेणखत व इतर सेंद्रिय खते, प्राकृतिक आणि समूह शेतीच्या माध्यमातून अनेक उद्दिष्ठे साध्य करत शेती व्यवसायात क्रांती घडवणे शक्य आहे’, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

गोवन ब्रॅण्ड अंतर्गत अनेक उत्पादने तयार होत आहेत. कुणबी साडी उत्पादन राज्यात सुरू केले असून देशपातळीवर मोठी मागणी आहे. नव्या योजनांसह तरुणाईचा सहभाग वाढला तर शेती व्यवसायाला मोठी गती मिळणे शक्य आहे. प्रत्येकाने शेतीत रुची दाखवावी, असे आवाहन आमदार डॉ शेट्ये यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT