Tilari Water  Dainik Gomantak
गोवा

250 कोटी खर्चून ‘तिळारी’ची दुरुस्ती

जलस्रोतमंत्री शिरोडकर : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांशी, मंत्र्यांशीही करणार चर्चा

दैनिक गोमन्तक

डिचोली : जवळपास 75 टक्के गोव्याला पाणी पुरवठा करणाऱ्या 'तिळारी' प्रकल्पाचा कालवा कमकुवत झाला असून, या कालव्याला भगदाड पडण्याचे प्रकार वाढले आहेत. या कालव्याची नव्याने दुरुस्ती गरजेची आहे. महाराष्ट्र आणि राज्य सरकारचा संयुक्त प्रकल्प असलेल्या तिळारी कालव्याची नव्याने दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव असून त्यासाठी सुमारे 250 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. एकदा का तिळारी कालव्याची दुरुस्ती झाली, की पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होईल,असे जलस्त्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी सांगितले.

यासंबंधी पुढील दोन ते तीन महिन्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि संबंधित मंत्र्यांची भेट घेऊन कालव्याचे दुरुस्तीकाम मार्गी कसे लावता येईल,यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असेही स्पष्ट केले.

जलस्रोत खात्याचे मंत्री शिरोडकर यांनी बुधवारी (ता.25 मे) डिचोलीतील आमठाणे धरणाला भेट देऊन धरण परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये उपस्थित होते.

तिलारी धरणाची पाहणी केल्यानंतर मंत्री सुभाष शिरोडकर यांनी जल स्त्रोत खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन धरणाची क्षमता, कार्यक्षेत्र आदी माहिती घेतली. आमठाणे धरण परिसर सौंदर्यीकरण प्रस्तावावरही चर्चा झाली. यावेळी आमदार डॉ. शेट्ये यांनी आमठाणे धरणाचा विकास करावा, अशी मागणी मंत्र्यांसमोर ठेवली. यावेळी जलस्त्रोतचे मुख्य अभियंता बदामी, कार्यकारी अभियंते के. पी. नाईक, वरिष्ठ अधिकारी सालेलकर तसेच जि.पं.सदस्य प्रदीप रेवोडकर व शेतकरी उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Joe Root Record: क्रिकेटच्या देवाचा कसोटीतील महान विक्रम धोक्यात, जो रूट करणार राडा? आहे इतिहास रचण्याची संधी...

Goa Tourism: पावसाळ्यातही गोव्यातील पर्यटन फुल्ल; बीचवर पर्यटकांची गर्दी

ट्रॉलर्स मालकांचे आंदोलन! बंदी असताना नियमांचे उल्लंघन; पारंपरिक मच्छीमारांवर बेकायदेशीर मासेमारीचा आरोप

प्रेमात धोका दिलेल्या व्यक्तीला पुन्हा जवळ करावं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं रंजक उत्तर; म्हणले...

Viral Video: तुमच्या पाया पडतो! भाजप नेत्याचे स्मशानभूमीत अश्लील उद्योग, विवाहित महिलेसोबत रेड हँड सापडला

SCROLL FOR NEXT